नवी दिल्ली वृत्तसंस्था : योगी सरकारने उत्तर प्रदेशातील जनतेला एक मोठा झटका मिळाला आहे. सरकारने 10 महिन्यांपूर्वी काढलेला व्हॅट पूर्ववत केला आहे. यामुळे पेट्रोलमध्ये 2.33 तर डिझेलमध्ये 1 रूपयांनी वाढ करण्यात आली आहे. नवीन किंमती सोमवारी रात्रीपासून अंमलात आल्या आहेत. आता भाव वाढीनंतर राजधानी लखनऊमध्ये पेट्रोल 73.66 रुपये प्रतिलिटर आणि डिझेल 65.28 रुपये प्रतिलिटर झाले आहे.
वाणिज्य कर विभागाच्या प्रस्तावानुसार आता पेट्रोलवरील व्हॅट 26.80 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त 16.74 रुपये असेलते लागू करण्यात येईल. त्याचप्रमाणे डिझेलवरील व्हॅट 17.48 टक्के किंवा 9.41 रुपये असेल, जे काही जास्त असेल, ते लागू करण्यात येईल. या दर वाढीनंतर राज्य सरकारच्या महसुलात वार्षिक 4000 कोटी रुपयांची वाढ होईल. त्यामुळे उत्तर प्रदेशातील 22 करोड जनतेला जरी फटका बसला असेल, मात्र राज्य सरकारला याचा फायदा होणार आहे.
उत्तर प्रदेश सरकारने ऑक्टोबर 2018 मध्ये महागड्या पेट्रोल आणि डिझेलपासून सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी दोन्ही वस्तूंवरील व्हॅटचे दर 3.56 टक्क्यांनी आणि 3.48 टक्क्यांनी कमी केले आहेत. यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती 2.50 रुपयांनी कमी झाल्या. आता सरकारने यात बरीच वाढ केली आहे.