नवी दिल्ली वृत्तसंस्था : काँग्रेसचे जेष्ठ नेते तसेच माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांचा आयएनएक्स मीडिया घोटाळा आणि मनी लाँड्रिंग प्रकरणातील अटकपूर्व जामीन दिल्ली न्यायालयाने फेटाळला आहे. न्यायमूर्ती सुनील गौर यांनी या संदर्भात निर्णय घेतला. त्यामुळे पी. चिदंबरम यांनी सुप्रीम कोर्टाकडे धाव घेतली आहे. तरी उच्च न्यायलयाने जमीन फेटाळल्याने सीबीआय कडून त्यांना अटक करण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
ईडी आणि सीबीआय ने पी. चिदंबरम यांना अटकपूर्व जमीन मिळण्याबाबत विरोध दर्शविला होता. आयएनएक्स मीडिया घोटाळा आणि मनी लाँड्रिंग प्रकरणी त्यांच्यावर कारवाई करण्यात आली होती. चिदंबरम हे चौकशीला सहकार्य करत नाहीत, त्यामुळे त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेणे गरजेचे आहे, असे ईडी आणि सीबीआय चे म्हणणे होते.
२००७ मध्ये चिदंबरम हे केंद्रीय अर्थमंत्री असताना आयएनएक्स मीडियाला विदेशी गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाकडून बेकायदेशीररीतीने मंजुरी मिळवून देण्यासाठी ३०५ कोटी रुपयांची लाच घेतल्याचा आरोप चिदंबरम यांच्यावर आहे. या प्रकरणात चिदंबरम यांचे पुत्र कार्ती यांना सीबीआय आणि ईडीने यापूर्वीच अटक केली होती. सध्या ते जामिनावर आहेत.