ब्रिटन : वृत्तसंस्था- एका महिलेने आपल्या एक्स बॉयफ्रेंडला फेक बाळाच्या सहाय्याने धमकावलं. त्याच्या प्रेमिकेला या सिक्रेट बाळाबद्दल सांगण्याची धमकी देत त्याला ब्लॅकमेल करत त्याच्याकडून लाखो रुपये उकळले. ब्रिटेनच्या एका कोर्टाने 26 वर्षीय चेलसिया रॉबर्ट्स हिला जेलची शिक्षा सुनावली आहे.
काही काळाने सदर महिलेने बाळ आजारी पडून मरण पावल्याचे सांगितले. यानंतर रेपचे आरोप करण्याची धमकी दिली. चेलसियाने एक्स बॉयफ्रेंडला धमकी देत 26 लाख रुपये उकळले. महिला एक्स बॉयफ्रेंडला म्हणायची की, तिने मुलगा जॅक्सला जन्म दिला आहे. परंतु खरं तर कोणताच मुलगा नव्हता. तिने फेक मुलाच्या नावाखाली ब्लॅकमेल केलं होतं.
ब्रिटेनच्या हल क्राऊन कोर्टाने महिलेला दोषी ठरवत 4 महिन्यांची जेलची शिक्षा दिली आहे. कोर्टात सांगण्यात आलं की, महिलेने प्रेग्नंसी आणि मुलाच्या डिलिव्हरीबाबत स्पष्टपणे खोटं सांगितलं होतं. कोर्टातील कागदपत्रांनुसार, जेव्हा एक्स बॉयफ्रेंडने महिलेकडे मुलाच्या फोटोसाठी मागणी केली तेव्हा तिने त्याला स्पष्ट नकार दिला. यानंतर त्याला शंका आली. याआधी तिने एक्स बॉयफ्रेंडसोबत रहात असताना एकदा अबॉर्शन केले होते. परंतु पुन्हा प्रेग्नंट झाल्याचे तिने खोटे सांगितले.