नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतात अमेरिकेचे दूतावास आणि वाणिज्य दूतावासने कोरोना व्हायरसला समोर ठेवत १६ मार्चपासून व्हिजा संबंधित प्रक्रिया रद्द केली असून त्याबद्दल अमेरिकी दूतावासाने विधान केले आहे. अमेरिकी दूतावासाने जारी केलेल्या विधानानुसार “भारतात अमेरिकी दूतावास आणि वाणिज्य दूतावास कोविड-१९ महामारी लक्षात घेता १६ मार्च २०२० ला प्रवासी आणि गैर प्रवासी व्हिजा प्रक्रियांना रद्द करत आहेत.”
ते म्हणाले की, “तुमची व्हिजा प्रक्रिया रद्द केले आहेत. जेव्हा मिशन इंडिया दूतावास संबंधी नियमित कामकाज सुरु केले तर प्रक्रिया सुरु केली जाईल आणि तुम्हाला परत वेळ दिला जाईल.” जगभरात कोरोना व्हायरसने ५००० पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला असून हा आजार अमेरिकेच्या ५० पैकी ४६ राज्यात पसरला आहे आणि तिकडे तब्बल २००० प्रकरणे समोर आली आहेत.
IMF मुख्यालयातील कर्मचारीही कोरोनाने संक्रमित
आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने सांगितले की, वॉशिंग्टन मुख्यालयाच्या एका कर्मचाऱ्यामध्ये कोरोना व्हायरसचे संक्रमण असल्याची पुष्टी झाली आहे. शुक्रवारी आयएमएफ प्रेस सेंटरने पाठवलेल्या ईमेलनुसार, “कोरोनामुळे संक्रमित झालेल्या एका कर्मचार्याने स्वत:ला वेगळे केले आहे आणि योग्य वैद्यकीय सेवा घेत आहे. आम्ही स्थानिक सार्वजनिक आरोग्य अधिकाऱ्यांसह या कर्मचार्यांशी संबंधित लोकांना ओळखत करत असून त्याने आणखी लोकांवर परिणाम होऊ शकतो.” या घटनेच्या पार्श्वभूमीवर आयएमएफने मुख्यालयाशी संबंधित सर्व कर्मचार्यांना घरातूनच काम करण्याचा सल्ला दिला आहे.