नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पाकिस्तानने म्हटले आहे कि ते वेगाने पसरणाऱ्या कोरोना व्हायरसशी जागतिक महामारीशी लढण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून प्रस्तावित सार्कच्या सदस्य देशांच्या व्हिडिओ परिषदेत सहभागी होणार आहे. या व्हायरसमुळे जगभरात ५ हजार पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे.
मोदींनी ८ सदस्यांच्या क्षेत्रीय समूहाशी शुक्रवारी संपर्क केला आणि दक्षिण आशियाच्या क्षेत्रीय सहयोग संघटना म्हणजे सार्क देशांच्या नेत्यांची व्हिडिओ परिषदेद्वारे बैठक करायचा सल्ला दिला आहे जेणेकरून कोरोना व्हायरसच्या प्रकोपापासून बचावासाठी मजबूत रणनीती तयार करू शकतील.
पाकिस्तानच्या पीएमने मोदींच्या प्रस्तावावर सकारात्मक प्रतिक्रिया दिली आहे आणि म्हणले कि परिषदेत सहभाग घेण्यास तयार आहेत. त्यांनी मानले आहे कि घातक कोरोना व्हायरसमुळे उत्पन्न झालेल्या भीतीला कमी करण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे.
पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या आयेशा सिद्दीकी यांनी शुक्रवारी ट्विट करत म्हटले की, ‘आम्ही सांगितले आहे कि आरोग्य मुद्यावर पाकिस्तानी पंतप्रधानांचे विशेष सहायक जफर मिर्झा सार्कच्या सदस्य देशांच्या व्हिडिओ परिषदेत सहभागी घेण्यास उपलब्ध राहणार आहेत.’ व्हायरस विरुद्ध पाकिस्तानच्या अभियानाचे नेतृत्व मिर्झा करत आहेत.
पंतप्रधान मोदींनी शुक्रवारी ट्विट करून सार्क देशांच्या नेत्यांना कोरोना विषाणूविरूद्ध लढण्यासाठी एकत्र येण्याचे आवाहन केले. पीएम मोदी यांनी ट्विटमध्ये म्हटले होते की, “आपली पृथ्वी कोविड -१९ कोरोना विषाणूविरूद्ध लढाई लढत आहे. विविध स्तरांवर, सरकार आणि लोकं त्याला सामोरे जाण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. जगातील मोठ्या लोकसंख्येचा दक्षिण आशिया आपल्या लोकांच्या आरोग्याचे रक्षण करण्यासाठी कसलीही कसर सोडणार नाही.”
यानंतर दुसर्या ट्वीटमध्ये त्यांनी लिहिले की, “सार्क देशांचे नेतृत्व कोरोना विषाणूविरूद्ध लढण्यासाठी एक कठोर रणनीती तयार करावी, असा माझा प्रस्ताव आहे. आम्ही व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आपल्या नागरिकांना निरोगी ठेवण्याच्या मार्गांवर चर्चा करू शकतो. आपण एकत्र येऊन जगासाठी एक उदाहरण ठेवू शकतो आणि पृथ्वीला निरोगी बनवण्यास योगदान देऊ शकतो.”
I would like to propose that the leadership of SAARC nations chalk out a strong strategy to fight Coronavirus.
We could discuss, via video conferencing, ways to keep our citizens healthy.
Together, we can set an example to the world, and contribute to a healthier planet.
— Narendra Modi (@narendramodi) March 13, 2020