बहुजननामा ऑनलाइन टीम – नवी दिल्लीःअमेरिकेतील राष्ट्रपतीपदाची निवडणूक(US Elections) आता रखडली आहे. सध्या डेमोक्रॅटचे जो बिडेन इलेक्टोरल मतदानाच्या शर्यतीत आघाडीवर आहेत, परंतु डोनाल्ड ट्रम्प हार मानण्यास तयार नाहीत. ट्रम्प यांनी अनेक राज्यांत काऊंटिंगमध्ये गोंधळ असल्याचा आरोप केला आहे. तसेच सर्वोच्च न्यायालयात जाण्याचेही सांगितले आहे. काही राज्यांत रिपब्लिकन पक्षानेही रिकाऊंटिंगसंदर्भात कोर्ट गाठले आहे.
आता हा प्रश्न आहे की, अमेरिकेचे सर्वोच्च न्यायालय निवडणुकीचा(US Elections) निकाल ठरवू शकेल काय? सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर राष्ट्रपती पदाची शपथ घेण्याची घटना आतापर्यंत अमेरिकन इतिहासात दोनदा घडली आहे.
केव्हा- केव्हा सर्वोच्च न्यायालयाने हस्तक्षेप केला आहे?
2000 मध्ये रिपब्लिकन पक्षातील जॉर्ज बुश आणि डेमोक्रॅट्समधील एल गोरे निवडणुकीच्या रिंगणात होते, तेव्हा फ्लोरिडामध्ये निवडणूक रखडली होती. त्यावेळी जॉर्ज बुश हे एकूण 7537 मतांनी पुढे होते, परंतु एल गोरी यांनी पुन्हा संपूर्ण राज्यात मतमोजणी करण्याची मागणी केली होती.
त्यानंतर जॉर्ज बुशच्या वतीने कोर्टाने पुन्हा रिकाऊंटिंग थांबवण्यास सांगितले. शेवटी सुप्रीम कोर्टाने बुशच्या बाजूने निकाल दिला आणि रिकाऊंटिंग थांबवून बुशला विजयी घोषित केले होते.
या व्यतिरिक्त सन 1876 मध्ये जेव्हा कॉंग्रेसने अंतिम निकालासाठी कमिशन तयार केली होती. ज्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश, सभागृह प्रतिनिधी, सिनेट सदस्य आणि इतरांचा समावेश होता. शेवटी, मतदानाच्या जोरावर राष्ट्रपतीच्या नावाचा निर्णय घेण्यात आला. रुदरफोर्ड बी. हेयसने अखेरीस डेमोक्रॅटच्या सॅम्युअल टिल्डनचा 1 मताने पराभव केला आणि ते देशाचे 19 वे राष्ट्रपती झाले.
आता पुन्हा एकदा अमेरिकेच्या निवडणुकांचे निकाल सुप्रीम कोर्टाच्या दिशेने जात आहे, त्यामुळे सर्वांच्या चिंताही वाढत आहेत. डोनाल्ड ट्रम्पची टीम न्यायालयाचा दरवाजा ठोठावत आहे, तिथे काही दिवसांपूर्वी डोनाल्ड ट्रम्पद्वारे एम्मी कॉर्नर बेनेट या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश बनल्या आहे. तथापि, टीम ट्रम्प यांच्याद्वारे केवळ राज्य स्तरावर न्यायालयात अपील केले गेले आहे.