बहुजननामा ऑनलाईन – उर्फी जावेद (Urfi Javed) ही कायमच तिच्या बोल्ड लुकमुळे आणि हटके फॅशनमुळे नेहमी चर्चेत असते. बिग बॉस ओटीटी मधून उर्फीला प्रसिद्धी मिळाली. उर्फीला नेहमी तिच्या हटके स्टाईलमुळे ट्रोल केले जाते. उर्फीची हि स्टाईल नेहमीच नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेत असते. उर्फी गेल्या अनेक दिवसांपासून खूपच चर्चेत होती. कारण ती लवकरच ‘खतरों के खिलाडी 13’ या रिअॅलिटी शोमध्ये झळकणार असल्याचे बोलले जात होते. आता अखेर ती या शो मध्ये सहभागी होणार नाही याची माहिती समोर आली आहे. यावेळी उर्फीने (Urfi Javed) या मागचे कारण देखील सांगितले आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
उर्फी नेहमीच तिच्या हटके आऊटफिटमुळे चर्चेत असते. गेल्या अनेक महिन्यांपासून उर्फी ही खतरो के खिलाडी 13 या शोमध्ये सहभाग होणार असल्याची चर्चा जोरात रंगली होती. या पर्वासाठी तिला विचारण्यात आल्याचेही बोलले जात होते. खतरो के खिलाडीची टीम सातत्याने तिच्याशी संपर्कात असल्याचे समोर येत होते. मात्र आता उर्फीने स्वतः हा शो करणार नसल्याचे सांगितले आहे. सध्या उर्फी जावेद कडे एक मोठा प्रोजेक्ट आहे आणि ती या प्रोजेक्टमध्ये खूपच व्यस्त आहे. खतरो के खिलाडी हा शो करण्यापूर्वी उर्फीने त्या प्रोजेक्टच्या तारखा निश्चित केल्यामुळे तिला खतरो के खिलाडी मधून माघार घ्यावी लागत आहे.
याआधी अनेकदा उर्फीने (Urfi Javed) स्वतः शो करण्याची इच्छा दर्शवली होती आणि उर्फी यंदाच्या
खतरो के खिलाडी मध्ये दिसणार असल्याने उर्फीचे चाहते देखील फारच उत्सुक होते.
आता उर्फीच्या चाहत्यांना तिच्या आगामी प्रोजेक्टची उत्सुकता लागली आहे.
तर उर्फी स्वतः देखील या प्रोजेक्टसाठी खूपच उत्सुक असल्याचे दिसत आहे.
लवकरच ती या प्रोजेक्ट संदर्भात अपडेट शेअर करणार असल्याचेही सांगितले.
उर्फी अलीकडेच एका दाक्षिणात्य मॅक्झिनच्या कव्हर पेजवर झळकली होती.
त्याचबरोबर प्रसिद्ध डिझायनर अबू जानी आणि संदीप खोसला या जोडीसाठी तिने मॉडेलिंग देखील केले होते.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Web Title : Urfi Javed | urfi javed reject rohit shetty khatron ke khiladi 13 reality show for this big reason
हे देखील वाचा :
Eknath Khadse | राष्ट्रवादीकडून एकनाथ खडसेवर मोठी जबाबदारी
Devendra Fadnavis | जुनी पेन्शन का नको? फडणवीसांचे आवाहन म्हणाले- ‘इमोशनल नको, प्रॅक्टिकल व्हा’