Eknath Khadse | राष्ट्रवादीकडून एकनाथ खडसेवर मोठी जबाबदारी

Eknath Khadse | eknath khadse finally decided from ncp eknath khadse has a big responsibility of ncp

मुंबई : बहुजननामा ऑनलाईन  राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्यावर पक्षाने मोठी जबाबदारी सोपवली आहे. राष्ट्रवादीकडून एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांची विधान परिषदेच्या (Legislative Council) गटनेते पदावर (Group Leader) नियुक्ती करण्यात आली आहे. विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे (Deputy Chairperson Neelam Gorhe) यांनी यासंदर्भात घोषणा केली आहे.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांची विधान परिषदेच्या गटनेतेपदी वर्णी लागण्याची शक्यता वर्तवली जात होती. तसेच यासंदर्भात राष्ट्रवादीकडून एकनाथ खडसे यांच्या विधान परिषदेच्या गटनेतेपदी नियुक्तीचे पत्र विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांना पत्र देण्यात आले होते. त्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. तसेच विधान परिषदेतील राष्ट्रवादीच्या प्रतोदपदी आमदार अनिकेत तटकरे (MLA Aniket Tatkare) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

 

एकनाथ खडसे यांची राजकीय कारकिर्द आणि त्यांचा अनुभव लक्षात घेऊन राष्ट्रवादीने त्यांच्यावर ही जबाबदारी सोपवली आहे.
गटनेते पदावर नियुक्ती करुन राष्ट्रवादीने एकप्रकारे भाजपला आव्हान देण्याचा प्रयत्न केला आहे.
खडसेंच्या माध्यमातून जळगावमध्ये राष्ट्रवादीची ताकद वाढली आहे.
येत्या निवडणुकीमध्ये पक्षाला त्याचा मोठा फायदा होणार आहे.

 

 

Web Title : Eknath Khadse | eknath khadse finally decided from ncp eknath khadse has a big responsibility of ncp

 

हे देखील वाचा :

IND vs AUS 4th Test | अहमदाबाद कसोटीत फिरकीपटू आर.अश्विनने माजी खेळाडू अनिल कुंबळेचा मोडला ‘तो’ रेकॉर्ड

MP Supriya Sule On Pune PMC | ‘महापालिका आयुक्तांकडे पाठपुरावा करूनही कामे होत नाहीत’ ! ‘समस्या न सुटल्यास आंदोलन करणार’; खासदार सुप्रिया सुळे यांचा इशारा

Devendra Fadnavis | जुनी पेन्शन का नको? फडणवीसांचे आवाहन म्हणाले- ‘इमोशनल नको, प्रॅक्टिकल व्हा’