बहुजननामा ऑनलाईन – सध्या भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS 4th Test) यांच्यात अहमदाबादमध्ये मालिकेतील चौथा कसोटी सामना खेळवला जात आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतासमोर एक मोठे आव्हान ठेवत सामन्यावर आपली पकड निर्माण केली आहे. हा सामना वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दृष्टीने टीम इंडियासाठी खूप महत्वाचा आहे. या सामन्यात भारताचा फिरकी गोलंदाज आर. अश्विनने 6 विकेट घेत एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. त्याने टीम इंडियाचा माजी दिग्गज फिरकी गोलंदाज अनिल कुंबळेचा रेकॉर्ड मोडला आहे. (IND vs AUS 4th Test)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
काय आहे तो विक्रम?
या सामन्यात 6 विकेट घेत आर. अश्विनने माजी दिग्गज फिरकी गोलंदाज अनिल कुंबळेचा एक रेकॉर्ड मोडला आहे. बॉर्डर गावसकर ट्रॉफीमध्ये सर्वाधिक 111 विकेट्स घेण्याच्या बाबतीत अनिल कुंबळे हा दुसऱ्या स्थानावर होता. आता अश्विनने त्यांचा रेकॉर्ड मोडून दुसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. अश्विनचे आजच्या सामन्यातील 6 विकेट पकडून बॉर्डर गावसकर ट्रॉफीमध्ये एकूण 113 विकेट्स झाले आहेत.ऑस्ट्रेलियाचा फिरकी गोलंदाज नॅथन लायन या यादीमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. त्याने बॉर्डर गावसकर ट्रॉफीमध्ये सर्वाधिक 113 विकेट्स घेतल्या आहेत.
अश्विनने या मालिकेत 24 विकेट घेतल्या
आर अश्विनने आतापर्यंत या मालिकेत 24 विकेट घेतल्या आहेत. यामध्ये त्याने नागपूर कसोटीत 8 विकेट, दिल्लीत 6 आणि इंदूरमध्ये 4 विकेट्स घेतल्या आहेत, तर आता अहमदाबाद कसोटीत 6 विकेट्स घेतल्या आहेत. (IND vs AUS 4th Test)
https://twitter.com/BCCI/status/1634100858194362368
उस्मान ख्वाजा आणि कॅमेरून ग्रीनने मोडला 63 वर्ष जुना विक्रम
उस्मान ख्वाजा आणि कॅमेरून ग्रीन यांनी भारतात 208 धावांची भागीदारी करून 63 वर्षांपूर्वीचा एक जुना
विक्रम मोडीत काढला आहे. आजच्याच दिवशी 63 वर्षांपूर्वी नॉर्म ओ’नील आणि नील हार्वे या जोडीने
मुंबईमध्ये भारताविरुद्ध 207 धावांची भागीदारी केली होती. आता 63 वर्षांनंतर ग्रीन-ख्वाजा यांनी 208
धावांची भागीदारी करून का मोठा विक्रम मोडीत काढला आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Web Title : IND vs AUS 4th Test | r ashwin equals anil kumbles record to become second highest wicket taker in border gavaskar trophy
हे देखील वाचा :
Devendra Fadnavis | जुनी पेन्शन का नको? फडणवीसांचे आवाहन म्हणाले- ‘इमोशनल नको, प्रॅक्टिकल व्हा’