बहुजननामा ऑनलाईन – पीडित मुलीच्या कार अपघाताच्या प्रकरणामध्ये अनेक नवीन खुलासे होत आहे. जिथे एकीकडे वक्तव्य सुरू असतानाच दुसरीकडे खुलासा झाला आहे की, ज्या ट्रकने पीडित तरुणीच्या कारला धडक मारली होती तो ट्रक फतेहपुरचे सपा नेता व पूर्व जिल्हा सचिव नंद किशोर उर्फ नंदूचा होता. या प्रकरणात, सपा नेत्यांचे म्हणणे आहे की, हा एक अपघात आहे. कारण नसताना याचे काहीही तर्क लावले जात आहे. बॅंकेपासून बचाव करण्यासाठी ट्रकच्या नंबर प्लेटवर ग्रीस लावले गेले होते.
समोर आलेल्या माहितीनूसार, फतेहपूरच्या लेलौली शहरातील सटाणा परिसर येथे राहणारी नंदूची पत्नी रामश्री असोथर ब्लॉक प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. नंदूला एकूण 4 भाऊ असून त्यांच्याकडे एकूण 27 ट्रक आहेत. नंदू आणि त्याचा दुसरा भाऊ देवेंद्र किशोर यांच्या सहकार्याने ट्रक चालवतात. भाऊ सुनील आणि पंकज घरी शेती करतात. अपघातात सामील झालेला ट्रक घटनेच्या दिवशी रायबरेली येथून फतेहपूरकडे परत जात होता. या विषयावर एडीजी लखनऊ झोन, राजीव कृष्णा यांनी सांगितले की, रविवारी दुपारी 1 वाजता उन्नाव बलात्कार पीडित महिलेच्या कारची आणि ट्रकची समोरासमोर धडक झाली. या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला.
याशिवाय ट्रक चालक, क्लिनर, ट्रक मालक, आमदार कुलदीपसिंग सेंगर व त्यांच्या सहकाऱ्यांचीही तपासणी केली जात आहे. ते म्हणाले की, ट्रक चालक, मालक, क्लिनर आणि भाजपाचे आमदार आणि त्यांचे सहकारी यांच्यात एक प्रकारची ओळख आहे की नाही याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. पोलिस या प्रकरणातील प्रत्येक घटकाचा तपास करत आहेत.