नवी दिल्ली : वृत्तसंस्था – रायबरेली येथे झालेल्या अपघातात गंभीर जखमी झालेल्या उन्नाव सामूहिक बलात्कार प्रकरणातील पिडीत तरुणी आणि तिच्या वकिलाची प्रकृती चिंतानक असून तिला व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आले आहे
रायबरेली येथे पिडीतेच्या कारला ट्रकने धडक दिली होती. त्यात पिडीत तरुणी गंभीर जखमी झाली आहे. तिच्यासोबत तिचे वकिलही गंभीर जखमी झाले आहेत. तर तिची काकू आणि मावशी या घटनेत मृत झाली आहे.
हा अपघात नसून घातपात असल्याचे बोलले जात आहे. तर सर्वोच्च न्यायायलायचे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी तिच्या प्रकृतीची विचारणा सुनावणीदरम्यान केली. तेव्हा तिची प्रकृती गंभीर असल्याने तिला उपचारासाठी लखनऊ च्या कींग जॉर्ज मेडीकल युनीवर्सिटीच्या रुग्णालयातील ट्रॉमा सेंटरमध्ये उपचार सुरु असून ती सध्या व्हेंटीलेटरवर असल्याचे सांगितले.तेव्हा सरन्यायाधीशांनी तिच्यावर दिल्लीत उपचार करण्याची तजवीज करता येईल का हे पाहण्यास सांगितले. तसेच तिला व तिच्या वकिलाला दिल्लीत आणण्याची आणि एम्समध्ये उपचाराची व्यवस्था करण्यास सांगितले.
King George Medical University hospital, Lucknow on #Unnao rape survivor & her lawyer admitted in the hospital: Their condition is critical. Both are on ventilator. But their condition is stable like yesterday. Their treatment is being done by team of experts at KGMU,free of cost
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) August 1, 2019