नवी दिल्ली : वृत्तसंस्था – रेल्वे प्रवासासाठी जाताना आरक्षण नसेल तर रेल्वे सुटण्याच्या आधी तिकीटासाठी रांगा लावाव्या लागतात. उशीरा आल्यानंतर धांदल तर उडतेच परंतु तिकीट काढेपर्यंत प्लॅटफॉर्मवरची रेल्वे निघून जाईल का याची भिती वाटते ? मग चिंता करू नका रेल्वेने प्लॅटफॉर्म तिकिटावरही प्रवास करण्याची नवी सोय केली आहे.
रेल्वे प्रवासाला निघताना काही वेळा घाईघाईत रेल्वे स्टेनशवर जातो. तेव्हा रेल्वेचा वेळ झालेला असतो. तिकीटाच्या रांगेत उभे राहिल्यावर रेल्वे प्लॅटफॉर्मवर आल्याचेही कळते. त्यानंतर मात्र काही वेळा रेल्वे सुटु नये यासाठी काही जण विना तिकीट प्रवास करण्याचा प्रयत्न करतात. मात्र टीसीने पकडले की त्याचा दंड किंवा तुरुंगवारी नक्की होते. त्यामुळे असे प्रसंग टाळण्यासाठी रेल्वेने प्लॅटफ़ॉर्म तिकिटावरही रेल्वेत प्रवास करण्याची सोय करून दिली आहे.
प्लॅट फॉर्म तिकीट म्हणजे काय ?
प्लॅटफॉर्मवर प्रवेश मिळण्यासाठी आवश्यक असलेले तिकीट म्हणजे प्लॅटफॉर्म तिकीट. हे तिकीट २ तासांच्या मुदतीचे असते. याचा अर्थ या तिकीटावर तुम्ही केवळ प्लॅटफॉर्मवर थांबू शकता. परंतु रेल्वेने प्रवासकरू शकत नाही. तर या तिकीटाची किंमत १० रुपये आहे.
कसा कराल प्रवास ?
प्लॅटफॉर्म तिकीटावर प्रवास करायचा असेल तर त्यासाठी रेल्वेत गेल्यानंतर रेल्वेने अधिकार दिलेल्या गार्ड, टिसी. किंवा इतर अधिकाऱ्याकडून रेल्वे प्रवासाची परवानगी घ्यावी लागेल. रेल्वे अधिकाऱ्याला आपली अडचण सांगून ती पटवून द्यावी लागेल. त्यामुळे या प्रवाशाला प्लॅटफॉर्म तिकीटावर प्रवास करण्यासाठी एक अधिकृत तिकीट दिले जाईल.
रेल्वेत जनरल तिकीटावर स्लीपर किंवा अन्य आरक्षित डब्याचे तिकीट दिले जाते. तशाच प्रकारे ही सुविधा असेल. गार्डच्या परवानगी पत्राद्वारे रेल्वेचा टीसी तिकीटाएवढा दर आणि २५० दंड आकारून नियमित प्रवासाचे तिकीट देणार आहे. परंतु त्याला आरक्षित जागा मिळेलच असे नाही.
ही खबरदारी घ्यावी लागेल
प्लॅटफॉर्म तिकीटावर रेल्वेत गेल्यानंतर सर्वात आधी टीसीला गाठावे लागेल. त्याच्याशी बोलल्यानंतर तुमचे कारण पटवून दिले की गार्डकडून परवानगी पत्र घ्यावे लागेल