बहुजननामा ऑनलाइन टीम – आपल्या समाजात मुलगा झाला तर तो वंशाचा दिवा म्हणून लोक त्याचा उत्साहाने स्विकार करून स्वागत करतात. पण बऱ्याचदा मुलीचा जन्म नाकारला जातो, ती अनेकांना नकोशी असते. अशावेळी मुलीच्या जन्माचा आनंद साजरा करणारे (free salon service )समाजात फारच कमी लोक असतात. पण मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर मध्ये एका सलून मालकाने आपल्या मुलीच्या जन्माचा अनोखा आनंदोत्सव साजरा केला आहे. त्याने बाप झाल्याच्या आनंदात येणा-या ग्राहकांना चक्क मोफत सलून सेवा दिली आहे. या सलून मालकाचे नाव सलमान आहे.
घरामध्ये मुलगी झाल्याच्या आनंदात सलमानने 24 तासांसाठी सलूनची सेवा फ्री केली होती. मुलीच्या जन्माच्या आनंदात सलून मालक सलमानने 4 जानेवारीला शहरातील त्याच्या तीनही सलूनमध्ये मोफत सेवा दिली आहे. सलमान माध्यमांशी बोलताना म्हणाला, घरात मुलीचा जन्म झाल्याने मी खूप खूश आहे, मुलीच्या जन्म झाल्यावर लोकांनी दुःखी होऊ नये, असेही सलमाने यावेळी सांगितले आहे.
रिपोर्ट्सनुसार, सलमानचे ग्वाल्हेरमध्ये तीन सलून आहेत. ज्यांच्या सर्व सेवा एका दिवसासाठी मोफत ठेवल्या होत्या. कोणीही येऊन मोफत कटिंग आणि दाढी करू शकत होते. ही गोष्ट जेंव्हा सोशल मीडियावर व्हायरल झाली तेंव्हा लोकांनी तिन्ही दुकानांमध्ये गर्दी केली होती. सलमान म्हणाला की, तिन्ही दुकानांमधील त्याच्या कर्मचाऱ्यांनी 400 लोकांना मोफत सेवा दिली. यासाठी ते सतत 15 तास काम करत होते. जेव्हा लोकांना मोफत सलून सेवेची माहिती मिळाली तेव्हा लोक सकाळपासून तिन्ही दुकानांमध्ये येऊ लागले. लोकही आपला नंबर येण्यासाठी चार- चार तास ताटकळत बसले होते.