बहुजननामा ऑनलाइन टीम – अमेरिकेचे नवनिर्वाचित संसद सदस्य ल्यूक लेटलो (वय 41) मंगळवारी (दि. 29) यांचा कोरोनामूळे मृत्यू झाला(US MP dies of corona) आहे. विशेष म्हणजे रविवारी त्यांचा शपथविधी होणार होता. ल्यूक जोशूआ लेटलो अमेरिकेच्या लुसियाना राज्यातील राजनिती तज्ज्ञ होते. त्यांना 2020 च्या लुईसियानाच्या 5 व्या काँग्रेससाठी संयुक्त राज्य अमेरिकाच्या हाऊस ऑफ रिप्रेझेन्टेटिव्हसाठी निवडण्यात आले होते.
ल्यूक लेटलो यांनी 18 डिसेंबर रोजी आपल्याला कोरोनाची लागण झाल्याचे सार्वजनिकरित्या सांगितले होते. त्यानंतर ते उत्तर लुसियानाच्या रिचलँड पॅरिशमध्ये असलेल्या घरी आयसोलेट झाले होते. प्रकृती बिघडल्यामुळे 19 डिसेंबरला त्यांना रुग्णालयात दाखल केले होते. त्यानंतर त्यांची प्रकृती बिघडत गेली. 23 डिसेंबर रोजी त्यांना आयसीयूत ठेवले होते. पण, मंगळवारी त्यांचे निधन झाले. लेटलो यांच्या मागे त्यांच्या पत्नी, जुलिया बरनहिल आणि दोन लहान मुले आहेत.
राजकीय नेत्यांनी व्यक्त केले दुःख
लेटलो कोविड-19 मुळे मरणाऱ्या एका हाय रॅकिंग अमेरिकी नेत्यांपैकी आहेत. लूइसियानाच्या गव्हर्नर जॉन बेल एडवर्ड्स यांनी त्यांच्या अंत्यसंस्कारावेळी झेंडा अर्ध्यापर्यंत आणण्याचा आदेश दिला होता. एडवर्ड्स यांनी लेटलो यांच्या आकस्मिक मृत्यूवर दु:ख व्यक्त केले आहे. त्यांनी लेटलो यांच्या परिवाराचेही सांत्वन केले.