बहुजननामा ऑनलाइन टीम – ओढणीने तयार केलेल्या झोपाळ्यावर झुलताना ओढणी गळ्याभोवती आवळल्याने सात वर्षीय बालिकेचा दुर्दैवी मृत्यू ( Girl dies)झाला. हि घटना नागझर-कुर्टी येथील हौसिंग बोर्ड परिसरात ही घटना बुधवारी घडली. रंजना चव्हाण असे मृत्यू झालेल्या बालिकेचे नाव आहे.
चव्हाण कुटूंबीय मूळचे उत्तर प्रदेशातील असून ते नागझर-कुर्टी येथे राहते. बुधवारी सकाळी आईवडील कामावर गेल्यानंतर या बालिकेने मोठ्या बहिणीकडे ओढणीचा झोपाळा बांधून देण्याचा आग्रह धरला. तिने तो बांधून दिला. छोट्या बहिणीने त्यावर झोके घ्यायला सुरुवात केली. नंतर मोठी बहीण घरकाम करण्यासाठी गेली. झोपल्यावर झोके घेणाऱ्या लहान बालिकेच्या गळ्याभोवती ओढणीचा फास आवळला गेला. त्यातून सुटण्यासाठी तिने धडपड केली आणि ती जमिनीवर पडून बेशुद्ध झाली. बालिकेची मोठी बहीण घरात कामात व्यग्र होती. त्यामुळे आपली बहीण जमिनीवर पडल्याचे माहितसुद्धा नव्हते. छोटी मुलगी बेशुद्ध पडल्याचे शेजारीच राहणाऱ्या महिलेच्या लक्षात आले असता तिने त्वरित त्या बालिकेला दवाखान्यात नेले. मात्र, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.