पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Crime | दोन मोक्कासह (MCOCA) Mokka एक डझनहून अधिक गुन्हे दाखल असलेला रवींद्र बर्हाटे (rti activist ravindra barate) तब्बल दीड वर्ष पोलिसांना गुंगारा देत होता. या काळात तो पुण्याजवळच्या परिसरात अधिक काळ असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. पुणे पोलिसांनी रवींद्र बर्हाटे याला आश्रय देणार्या वकीलाला अटक (Pune Crime) केली आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
सागर संजय म्हस्के adv sagar sanjay mhaske (वय ३२, रा. म्हस्के वस्ती, कळस -आळंदी रोड) असे या वकीलाचे नाव आहे.
रवींद्र बर्हाटे (rti activist Ravi Barate) याला लपून छपून राहण्यास मदत केल्याप्रकरणी सागर म्हस्के याला अटक केली आहे. म्हस्के याच्या रुमवर राहून बर्हाटे याने व्हिडिओ प्रसारित करुन पोलिसांना आव्हान दिले होते. हडपसर पोलीस ठाण्यात (Hadapsar Police Station) दाखल असलेल्या खंडणीच्या गुन्ह्यात रवींद्र बर्हाटेसह 13 जणावंर गुन्हा दाखल आहे. त्यात मोक्का कारवाई करण्यात आली असून त्याचा तपास सहायक पोलीस आयुक्त सुरेंद्र देशमुख (ACP Surendranath Deshmukh) हे करीत आहेत.
तपासात तांत्रिक विश्लेषक करता रवींद्र बर्हाटे हा सागर म्हस्के याच्या म्हस्के वस्ती येथील घरात रहात होता, हे निष्पन्न झाले आहे. बर्हाटे याला फरार राहण्यास मदत केल्याप्रकरणी अॅड. सागर म्हस्के याला अटक करण्यात आली आहे. त्याला आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
रवींद्र बर्हाटे याच्या शोधासाठी पुणे पोलिसांचे पथक राज्यातील अनेक शहरात गेले होते.
तसेच शेजारील राज्यातही गेले होते.
असे असताना बर्हाटे हा पुणे शहराच्या आसपासही अनेक दिवस लपून रहात होता.
पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (Pune CP Amitabh Gupta), सह आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे (Dr. Ravindra Shisve, Jt CP Pune), उपायुक्त श्रीनिवास घाडगे (DCP Shrinivas Ghadge) यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त सुरेंद्र देशमुख (ACP Surendra Deshmukh) आणि त्यांच्या सहकार्यांनी आरोपीस अटक केली आहे.
Web Title : Pune Crime | Pune police arrests Pune lawyer sagar sanjay mhaske for sheltering RTI activist Ravindra Barate
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Congress | काँग्रेसच्या कार्यकारिणीत पुण्यातील 7 पदाधिकार्यांना संधी, रमेश बागवे शहराध्यक्षपदी कायम