नवी दिल्ली : वृत्तसंस्था – MoPNG e-Seva | स्वयंपाकाच्या गॅसची किंमत प्रचंड वाढल्याने सर्वसामान्य माणून हैराण झाला आहे त्यातच देशातील अनेक भागात गॅस एजन्सीवाले ग्राहकांकडून भाडे वसूल करण्याच्या नावाखाली जास्त दर आकारात (Gas Agency Charges) असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. परंतु तुम्हाला सुद्धा असा अनुभव येत असेल तर ताबडतोब त्यांच्याविरूद्ध तक्रार दाखल करू शकता. यासाठी तुम्हाला केवळ एक ट्विट करायचे आहे. यानंतर गॅस सेक्टरची सोशल मीडिया टीम (MoPNG e-Seva) तुमच्या तक्रारीेचे निवारण करेल.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
अलिकडेच एक असे प्रकरण समोर आले. एका ट्विटर यूजरने बिहारच्या मधुबनी जिल्ह्यातील एका गॅस एजन्सीद्वारे घेतल्या जात असलेल्या अतिरिक्त शुल्काबाबत तक्रार केली होती. यानंतर गॅस सेक्टरच्या सोशल मीडिया हेल्पने त्या तक्रारीवर माहिती घेतली.
पंचदही गैस एजेंसी राजनगर मधुबनी बिहार द्वारा सभी उपभोक्ता से 35 से 70 रुपया अतिरिक्त शुल्क भाड़ा के नाम पर लिया जा रहा है और भाड़ा नहीं देने पर सलेंडर नहीं दिया जा रहा है @narendramodi
— GULSHAN KUMAR (@GULSHAN55909175) August 26, 2021
ट्विटर यूजरने लिहिले – पंचदही गॅस एजन्सी, राजनगर, मधुबनी, बिहारद्वारे सर्व ग्राहकांकडून 35 ते
70 रूपये अतिरिक्त शुल्क भाडे वसूलीच्या नावाखाली घेत आहे आणि भाडे न दिल्यास सिलेंडर दिला जात नाही.
तक्रारीच्या उत्तरात MoPNG e-Seva ने ट्विट करत ग्राहकाला म्हटले की, तक्रार दाखल करण्यासाठी, कृपया आम्हाला कंपनीचे नाव (आयओसीएल, बीपीसीएल किंवा एचपीसीएल), 17 अंकांचा एलपीजी आयडी, ग्राहक क्रमांक, एजन्सीचे नाव, जिल्हा, ठिकाण आणि नोंदणीकृत मोबाइल नंबर द्या, जेणेकरून आम्ही मदत करू शकतो.
अपनी शिकायत दर्ज करने के लिए, कृपया हमें अपने सेवा प्रदाता का नाम (आईओसीएल, बीपीसीएल या एचपीसीएल), 17 अंकों की एलपीजी आईडी, उपभोक्ता संख्या, एजेंसी का नाम, जिला, स्थान और आपका पंजीकृत संपर्क नंबर साझा करें ताकि हम आपकी सहायता कर सकें।
— MoPNG e-Seva (@MoPNG_eSeva) August 26, 2021
सामान्यांना महागडा गॅस परवडेना
एका रिपोर्टनुसार चालू आर्थिक वर्ष (2021-22) च्या पहिल्या तिमाही (एप्रिल-जून) मध्ये उज्ज्वला
योजनेंतर्गत 3.2 कोटी कंझ्युमरने गॅस रिफील केला नाही. मागील एक वर्षात घरगुती गॅस सिलेंडरच्या
किमतीत 265 रुपयांची वाढ झाली आहे.
Web Title : mopng e seva if the gas agency is charging you more price in the name of fare then complain like this immediately
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Congress | काँग्रेसच्या कार्यकारिणीत पुण्यातील 7 पदाधिकार्यांना संधी, रमेश बागवे शहराध्यक्षपदी कायम