बहुजननामा ऑनलाइन – संयुक्त अरब अमीरातची कंपनी कराकल भारतीय लष्कराला 93,895 कार्बाइनचा पुरवठा करणार आहे. मेक इन इंडिया मोहिमेंतर्गत हा करार 2018 पासून प्रलंबित होता. कंपनीने भारतात जमीन, ठिकाण आणि स्थानिक सहकारी यांची माहिती घेतली आहे. तसेच भारतात रायफल बनवण्याची आपली प्रतिबद्धता पुन्हा स्पष्ट केली आहे.
कंपनीच्या वक्तव्यानुसार, कराकलरायफल पूर्णपणे भारतात बनवण्यासाठी तयार आहे. कंपनीची कार 816 रायफलमध्ये फिट होणारे 20 टक्केपेक्षा जास्त कंपोनन्ट अगोदरच भारतात बनत आहेत. कंपनीने भारतात कार्बाइन बनवण्यासाठी तंत्रज्ञान हस्तांतरणाचे सुद्धा संकेत दिले आहेत.
दोन वर्षांपूर्वी प्रदर्शन आणि तंत्रज्ञाने क्षमतेच्या अधारावर कंपनीने अनेक अंतरराष्ट्रीय कंपन्यांना मागे टाकत ही बोली जिंकली आहे आणि आता 12 महिन्यांच्या आत उत्पादन सुरू करायचे आहे.