मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – Uddhav Thackeray | बंजारा समाजाचे (Banjara Society) महंत सुनिल महाराज (Sunil Maharaj) यांनी शिवबंधन बांधले. यावेळी त्यांचे शिवसेनेत (Shivsena) स्वागत करताना उद्धव ठाकरे यांनी संजय राठोड (Sanjay Rathore) यांच्यावर नाव न घेता निशाणा साधला. ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले, साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा… असे आपण म्हणतो. नवरात्रीच्या मुहूर्तावर बंजारा समाजातील महंतांनी शिवसेनेत प्रवेश केला, मी त्यांचे स्वागत करतो. बंजारा समाजातील कडवट शिवसैनिक (Shiv Sainik) आजही आमच्यासोबत आहेत. कारण, शिवसेनेने ज्यांना मोठे केले, त्यांनी पाठीत खंजीर खुपसला. पण, बंजारा समाजाच्या रक्तात गद्दारी नाही, त्यामुळे हा समाज आमच्यासोबत आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून आज बंजारा समाजाचे महंत सुनील महाराज व राज्यातील बंजारा समाजाच्या प्रमुख सदस्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. pic.twitter.com/KKXSZBaUNo
— ShivSena – शिवसेना (@ShivSena) September 30, 2022
तर महंत सुनिल महाराज यांनी म्हटले की, आज पंचमीची यात्रा असून पोहोरादेवीच्या यात्रेचा मुहूर्त साधून मी शिवसेनेत प्रवेश करत आहे.
संपूर्ण राज्यात 1.5 ते 2 कोटी बंजारा समाजबांधवांना न्याय देण्यासाठी आम्ही खंबीरपणे उद्धव ठाकरे
(Uddhav Thackeray) यांच्यासोबत राहणार आहोत.
कारण, शिवसेनाच बंजारा समाजाला न्याय देऊ शकते, सत्तेत वाटा देऊ शकते.
काही दिवसांपूर्वी महंत सुनील महाराज बंजारा समाजाचे प्रश्न घेऊन, समाजहिताचे प्रश्न,
पोहरादेवी तीर्थक्षेत्र विकासाचे प्रश्न घेऊन मुंबईत बंजारा समाजाचे नेते मंत्री संजय राठोड यांना भेटण्यासाठी त्यांच्या कार्यालयात गेले होते.
तिथे राठोड यांनी त्यांना हीन वागणूक दिली. राठोड यांनी महंतांना कार्यालयात 4 तास थांबवून ठेवले.
त्यानंतर भेट झाल्यानंतर मंत्र्यांनी 10 मिनिटेही वेळ दिला नाही.
माझे तिथे जाणे राठोड यांना आवडले नव्हते, अशी माहिती सुनिल महाराज यांनी दिली होती.
यानंतर त्यांनी शिवबंधन बांधण्याचा निर्णय घेतला.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणापासून (Pooja Chavan Suicide Case) चर्चेत असलेले सध्याचे शिंदे गटाचे (Shinde Group) मंत्री संजय राठोड यांच्याकडे समाजाचा चेहरा म्हणून पाहिले जात होते.
परंतु आता राठोडांनाच टक्कर देण्यासाठी बंजारा समाजाचे महंत सुनिल महाराज यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या (Shiv Sena chief Uddhav Thackeray) उपस्थितीत मातोश्रीवर जाऊन शिवबंधन बांधल्याने राठोड अडचणीत आले आहेत.
Web Title :- Uddhav Thackeray | treason is not in the blood of banjara society mahant sunil maharaj tied shivbandhan in front of uddhav thackeray
हे देखील वाचा :
MP Supriya Sule | RSS वर बंदीची मागणी कोणी केली असेल तर…, खा. सुप्रिया सुळेंचे मोठे वक्तव्य