मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – Uddhav Thackeray | शिवसेनेने (Shivsena) मागील काही काळापासून पक्षातील बंडखोरांवर थेट हल्लाबोल करण्याचे सत्र अवलंबले आहेत. आजही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शिंदे गटावर (Shinde Group) जोरदार हल्लाबोल केला आहे. भगव्याला कोणी हात लावण्याचा प्रयत्न केला तर त्याला दाखवून द्या, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. ते माध्यमांशी बोलत होते.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शिंदे गटाचा उल्लेख पुन्हा गद्दार असा करत म्हटले की, माझा माझ्या शिवसैनिकांवर (Shivsainik) विश्वास आहे. एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) गटाने नोंदणीसाठी एजंट लावले आहेत. जेवढी सदस्य संख्या ते करत आहेत, त्याच्या दहापट सदस्य संख्या मला हवी आहे. शिवसेनेची ताकत वाढली पाहिजे, केवळ गर्दी आणि फोटो नको. कारण फोटो घेऊन निवडणूक आयोगाकडे (Election Commission) गेलो, तर तुमचे सदस्य दाखवा असे ते म्हणतील. भविष्यात शिवसेनेच्या नादी लागण्याची कोणाची हिंमत व्हायला नको.
उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, आपल्याला जिंकायचे आहे, मी कोणालाही कमी लेखत नाही.
प्रतिज्ञापत्र एवढी झाली पाहिजे की, भविष्यात शिवसेनेच्या नादी लागण्याची कोणाची हिंमत झाली नाही पाहिजे.
कोणालाही शिवसेनेचा भगवा हिसकावून देऊ नका. भगव्याला हात लावण्याचा कोणी प्रयत्न केला तर त्याला दाखवून द्या,
असे म्हणत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सोबतच्या बंडखोर आमदारांना (Rebel MLA) इशारा दिला आहे.
Web Title : – Uddhav Thackeray | Shivsena chief uddhav thackeray slams cm eknath shinde group
हे देखील वाचा :