Udayanraje Bhosale | ‘… तर छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊ नका’ – उदयनराजे भोसले

Udayanraje Bhosale | udayanraje bhosale press conference on chhatrapati shivaji maharaj controversy

सातारा : बहुजननामा ऑनलाईन छत्रपती शिवाजी महाराजांचे सर्वच पक्ष नाव घेतात. पण, ते त्यांची भूमिका केव्हा स्पष्ट करणार आहेत? असा प्रश्न उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी विचारला आहे. गेले काही दिवस शिवाजी महाराजांवर वादग्रस्त वक्तव्ये केल्यामुळे वाद उफाळला होता. त्यावर उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी पत्रकार परिषद घेतली होती.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

यावेळी पत्रकार परिषदेत भोसले म्हणाले, प्रत्येक पक्ष शिवाजी महाराजांचे नाव घेतो. सर्वधर्मसमभाव याची व्याख्या आता बदलली आहे का? प्रत्येकजण आपल्या सोयीने याबाबत वागत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा हेतू अमलात आणत नसाल, तर त्यांचे नाव तरी का घेता? पाकिस्तान वेगळे झाले, बांगलादेश वेगळे झाले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात हे सर्व प्रांत एकच होते. त्यानंतर देशाचे तीन तुकडे झाले, आता किती होतील माहीत नाही. छत्रपतींच्या विचारांनी देशाला एकत्र ठेवले. त्यांच्या विचारांचा विसर पडला, तर काहीही होणार नाही. प्रत्येक माणसाचा छत्रपतींनी सन्मान केला. प्रत्येक धर्माचा त्यांनी सन्मान केला. त्यामुळे त्यांचा सन्मान करणेदेखील प्रत्येक माणसाची तसेच पक्षाची जबाबदारी आहे.

 

आज राज्यपाल काहीतरी बोलले, उद्या मोठ्या पदावरील आणखी कोणी बोलेल. आम्ही शांत आहोत याचा अर्थ बांगड्या भरल्या नाहीत. शिवाजी महाराजांची कोणासोबत तुलना होऊ शकत नाही. तरीदेखील लोक करतात. त्यामुळे मनाला यातना होतात. आपल्याला देशाच्या विभागणीतून कोणाला काही मिळाले नाही. उलट देशाचे तीन तुकडे झाले. आतादेखील शिवाजी महाराजांमुळे देश एकसंघ आहे. त्यांचे विचार जर सोडले, तर आगामी काळात देशाचे काय होईल माहीत नाही. त्यामुळे देशाला अबाधित ठेवायचे असेल, तर शिवाजी महाराजांचे विचारच आत्मसात केले पाहिजेत. त्यामुळे त्यांचा सर्वांनी आदर केला पाहिजे, असे यावेळी भोसलेंनी नमूद केले.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

Web Title :- Udayanraje Bhosale | udayanraje bhosale press conference on chhatrapati shivaji maharaj controversy

 

हे देखील वाचा :

Aditya Thackeray | ‘हे सर्व म्हणजे महाराष्ट्राचे खच्चीकरण आणि आर्थिक अलगीकरण करण्याचा प्रयत्न’ – आदित्य ठाकरे

Shraddha Walkar Murder Case | श्रद्धा वालकर हत्या प्रकरणात आफताबच्या नव्या प्रेयसीची ‘एन्ट्री’

Pune Crime | मित्रांच्या पार्टीत नशेत असलेल्या कॉलेज तरुणीवर बलात्कार, वारजे परिसरातील धक्कादायक घटना

Pune PMC News | येरवडा मनोरुग्णालयाच्या जागेवरील बेकायदा झोपड्या हलविणार