पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – मुंबई–पुणे ‘एक्सप्रेस हायवे‘ला कार आणि लक्झरी बस यांच्यात झालेल्या अपघातात दोन जागीच ठार तर दोन गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात रविवारी रात्री साडे आकराच्या सुमारास तळेगावच्या हद्दीत घडला. मृतामध्ये एका डॉक्टरचा समावेश आहे.
कार चालक ज्ञानेश्वर भोसले आणि प्रवाशी डॉ. केतन श्रीपाद खुर्गेकर यांचा मृत्यु झाला तर जयेश पवार आणि प्रमोद भिलारे (दोघे रा. मुंबई) हे गंभीर जखमी झाले असून पुढील उपचारासाठी त्यांना संचेती रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबई–पुणे ‘एक्सप्रेस हायवे‘ ला रविवारी कार (एमएच 14; जीयू 1158) ह्युंदाई एक्सेंट आणि लक्झरी बस (केए 56, 2555) यांच्यात भिषण अपघात झाला. यामध्ये कार चालक आणि त्यातील प्रवाशी डॉक्टर दोघे जागीच मृत्यूमुखी झाले. तर दोनजण जखमी झाले असून कारचा चक्काचूर झाला आहे. पोलिस निरीक्षक यांनी तत्काळ हालचाली करुन वाहतुक सुरळीत केली. तपास शिरगांव पोलिस चौकीचे पोलिस करत आहेत.
- डाळिंब आठवड्यातून एकदा तरी अवश्य खावे, आरोग्य आणि सौंदर्यासाठी उपयुक्त
- हातांवर ‘हे’ ४ संकेत दिसतात का? असतील तर व्हा सावध, दुर्लक्ष करू नका
- नवजात बाळाच्या आईसाठी फायदेशीर आहेत ‘हे’ पदार्थ, जाणून घ्या
- स्तनाच्या कॅन्सरपासून दूर ठेवतील ‘हे’ ६ ‘सुपरफूड’, आहारात अवश्य करा समावेश
- महिलांनी रोज खावेत हरभरे आणि गूळ! होतील ‘हे’ खास फायदे, जाणून घ्या
- या’ पाच मिनिटांच्या उपायाने ३० दिवसांत कमी होईल वजन, जाणून घ्या
- लहान मुलांना ‘पॅरासिटामॉल’ देताय ? मग ‘ही’ काळजी अवश्य घ्या !
- कोणती भाजी उकडून खाल्ल्याने होतात कोणते आरोग्य फायदे, जाणून घ्या