नवी दिल्ली : वृत्तसंस्था – गुगल पे एक ऑनलाईन पेमेंट अॅप आहे, जे UPI द्वरे पैशांची देवाण-घेवाण करण्यास मदत करतं. याचं डिजिटल वॉलेट स्टोर्स, ऑनलाईन खरेदी, आणि मित्र व नातेवाईकांना पैसे पाठवण्यासाठी उपयोगी ठरतं. यात युजरला फक्त आपलं बँक अकाऊंट लिंक करायचं असतं. जर तु्म्हाला एकापेक्षा जास्त बँक अकाऊंट लिंक करायचे असतील तर यात तसा ऑप्शनही उपलब्ध आहे. आपल्या m-wallet मध्ये एकापेक्षा जास्त अकाऊंट अॅड करण्यासाठी काही सोप्या स्टेप्स फॉलो करा.
1) सर्वात आधी गुगल पे ओपन करा. टॉपला राईट साईटला तुम्हाला More चा आयकॉन दिसेल तिथे त्यावर टॅप करा.
2) आता Settings टॅप करा आणि ‘Payments methods’ मध्ये जा.
3) Payment Method वर आल्यानंतर येथे बँक अकाऊंट अॅड करा.
4) यानंतर दिलेल्या लिस्टमधील बँक सिलेक्ट करा. यात तुम्हाला काही माहिती भरावी लागेल जसं बँकेच्या एटीएम कार्डचे शेवटचे 6 अंक आणि एक्सपायरी डेट इत्यादी.
5) यानंतर तुम्ही दिलेली माहिती अॅप व्हेरीफाय करतं. यासाठी तुम्हाला बँकेकडून एसएमएस येतो.
6) आता तुम्ही नवीन UPI PIN अॅड करून कंफर्म करा.
Note : गुगल पे मध्ये अॅड केलेल्या मल्टीपल बँक अकाऊंटपैकी कोणतंही एक बँक अकाऊंट युजर प्रायमरी अकाऊंट बनवू शकतात. याचा अर्थ असा की, जेव्हा युजर्स अॅपमध्ये देवाण-घेवाण करतील तेव्हा ते अकाऊंट डिफॉल्ट अकाऊंट म्हणून काम करेल. यासाठी काही स्टेप्स फॉलो कराव्या लागतात.
1) सर्वात आधी Settings मध्ये जा.
2) Settings यात ‘Payments method’ सिलेक्ट करा.
3) जे बँक अकाऊंट तुम्हाला प्रायमरी बनवयाचं आहे ते सिलेक्ट करा.
4) ‘Select as primary account’ सिलेक्ट करा.