नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जगातील प्रसिद्ध आणि दिग्गज बास्केटबॉल कोबी ब्रायंट यांचा २६ जानेवारी रोजी हेलिकॉप्टर अपघातात निधन झाले असून त्यांच्या निधनानंतर केवळ क्रीडाविश्वातच नाही तर जगभरात हळहळ व्यक्त केली आहे. पण आता कोबी यांच्या मृत्यूबद्दल एक धक्कादायक बाद समोर आली असून ८ वर्षांपूर्वीच एका ट्विटर यूजरने आपल्या ट्विटरवरून कोबीचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू होईल, असे ट्विट केले होते.
१४ नोव्हेंबर २०१२ रोजी @dotNoso नावाच्या यूजरने कोबी ब्रायंटचा मृत्यू एका हेलिकॉप्टर अपघातात होईल, असे ट्विट केले होते. आणि ही भविष्यवाणी खरी झाली असून ते ट्विट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
https://twitter.com/A_SAKNAN/status/1221537746205978624
पण या ट्विटर युजरबाबत आता राग व्यक्त केले असून विविध मिम्ससुद्धा तयार केले आहे. ४१ वर्षीय कोबीसह त्याच्या १३ वर्षाच्या मुलीचा मृत्यू अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथे एका हेलिकॉप्टर दुर्घटनेत झाला.
कोबीच्या निधनामुळे त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला असून सोशल मीडियावर भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली, उपकर्णधार रोहित शर्मा यांच्यासह अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्यासह अनेक जणांनी दुःख व्यक्त केले आहे.
Visit : bahujannama.com