बहुजननामा ऑनलाइन टीम – ट्विटर, फेसबुक(Twitter ) आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म अमेरिकेच्या संसदेत झालेल्या हिंसाचारानंतरच मोठ्या प्रमाणात खबरदारी घेत आहे. ट्विटरने म्हटले की, त्यांनी क्यूएऑन संबंधित कन्टेन्ट ( Pro-Trump QAnon Conspiracy) शेयर करणारी सुमारे 70000 ट्विटर खाती निलंबित केली आहेत. ते सर्व स्वत: ला ट्रम्पचे समर्थक म्हणून घोषित करीत होते आणि फार राइट कॉन्सीपीरेसी थियरी ग्रुप क्यूएनॉनद्वारे प्रचारित तथ्यहीन कन्टेन्ट शेअर करीत होते. हे सर्वजण या कंटेंटद्वारे कॅपिटल हिलवर झालेला हल्ला योग्य ठरविण्याचा प्रयत्न करीत होते.
ट्विटरने एक निवेदन जारी केले आहे –
वॉशिंग्टनमधील हिंसक घटनांच्या पार्श्वभूमीवर आणि याचा प्रसार होण्याच्या शक्यतेच्या पार्श्वभूमीवर आम्ही ती हजारो ट्विटर अकाऊंट्स कायमस्वरूपी बंद करण्यास सुरवात करीत आहोत जे क्यूऑनशी संबंधित कन्टेन्टला प्रोत्साहन देतात. ही सर्व खाती अत्यंत दुर्भावनापूर्ण आणि समाजाला विभागणारा कन्टेन्ट शेअर करत होते आणि हे सर्व कन्टेन्ट क्यूएनॉन ग्रुपद्वारे प्रोत्साहित आहे. आम्ही अशाप्रकारच्या अफवा आणि कॉन्सपिरेसी थियरीज पसरण्यास परवानगी देऊ शकत नाही, हे अत्यंत हानिकारक आहे. या कन्टेन्टद्वारे ट्रम्पचे समर्थक प्रचार करत आहेत की राष्ट्रपती डेमोक्रॅट्स पार्टी, हॉलिवूड आणि तथाकथित ‘डीप स्टेट’ च्या अश्या लोकांविरुद्ध लढा देत आहेत, जे मुलांवर लैंगिक अत्याचार करत आहेत. या सर्वांना वाचवण्यासाठी ट्रम्प यांच्याविरूद्ध कट रचले जात आहे.
कायमस्वरूपी बंद होतायेत खाती
ट्विटरने सोमवारी म्हटले की, अशा प्रकारचा खोटा कन्टेन्ट शेअर करणारी खाती कायमची बंद केली जात आहेत. विशेषत: क्यूऑनशी संबंधित कोणतीही सामग्री ताबडतोब बंद केली जाईल. क्यूएनॉन ग्रुपच्या म्हणण्यानुसार, ट्रम्प यांना पराभूत करण्यासाठी सर्व वाईट शक्ती एकत्र झाली आहे आणि जगाला सुधारण्यासाठी देवाने ट्रम्प यांना पाठवले आहे. ट्रम्प समर्थकांनी कॅपिटल हिलमधील हिंसाचारासाठी बंदुका व्यतिरिक्त एका ट्रकमध्ये 11 देशी बॉम्ब आणि काही शस्त्रे आणली होती. दरम्यान, नॅशनल गार्ड लवकर आल्याने हे लोक या बॉम्बसह कॅपिटल इमारतीत प्रवेश करू शकले नाहीत. दुसरीकडे, अमेरिकन गुप्तचर यंत्रणांनी देखील इशारा जारी केला आहे की, 20 जानेवारीला राष्ट्रपती इलेक्ट जो बिडेन यांच्या शपथविधी सोहळ्यापूर्वी हिंसाचार होऊ शकतो.
ट्रम्प यांच्या विरोधात महाभियोग प्रस्ताव
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भडकाऊ विधानांना जबाबदार धरले जात आहे. डेमोक्रॅटिक पक्षाने सोमवारी अमेरिकन संसदेत त्यांच्या विरोधात दोन महाभियोग प्रस्ताव सादर केला आहे. त्यात ट्रम्प यांनी बंडखोरीला प्रवृत्त केल्याचा आरोप केला आहे आणि असा दावा केला आहे की ट्रम्प यांनी अमेरिकेच्या संसदेत हिंसाचारास प्रवृत्त केले होते. डेमोक्रॅट बुधवारी अमेरिकेच्या संसदेत हल्ल्यासाठी आणि यात जबरदस्तीने घुसणाऱ्यांना भडकविल्याबद्ल राष्ट्रपतींच्या विरोधात महाभियोग किंवा 25 व्या दुरुस्तीचा वापर करून त्यांना पदावरून दूर करायचे आहे.