नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना विषाणू लॉकडाऊनच्या काळात डीडीच्या चॅनेल्सनी सगळे रेकॉर्ड तोडले होते आणि टीआरपी रँकिंगमध्ये अव्वल स्थान मिळवले होते. रामायण आणि महाभारत या कार्यक्रमाचे प्रसारण पूर्ण झाल्यानंतर डीडीची टीआरपी पुन्हा खाली आली. तरी अजूनही डीडी वरचा एक कार्यक्रम लोकांना खूप आवडतो, हा कार्यक्रम लेटेस्ट रँकिंग मध्ये दुसऱ्या स्थानावर आहे.
जर लेटेस्ट रँकिंगचा विचार केला तर यावेळी पहिल्या स्थानावर झी-टीव्हीचा कार्यक्रम कुंडली भाग्य आहे. याच्या 33व्या आठवड्यात 13384 इम्प्रेशन्स आहेत. त्यानंतर डीडी नॅशनलच्या श्री कृष्ण या कार्यक्रमाचा नंबर आहे त्याचे 11586 इम्प्रेशन्स आहेत. रामायणाचं प्रसारण संपल्यानंतर याची सुरुवात झाली होती. त्यानंतर हा कार्यक्रम लोकांच्या पसंतीस उतरला आहे. काही आठवड्यात हा कार्यक्रम पहिल्या स्थानी येऊ शकतो.
या रँकिंगमध्ये तिसऱ्या स्थानी दंगलवर प्रसारित होणारा रामायण हा कार्यक्रम आहे. चौथ्या स्थानी स्टार प्लसवर प्रसारित होणारा अनुपमा आणि पाचव्या स्थानी झी टीव्ही वर प्रसारित होणारा कुमकुम भाग्य हा कार्यक्रम आहे. तर, ग्रामीण भागात मात्र दंगलला अधिक पसंती असल्याचे दिसून येते. पहिल्या आणि दुसऱ्या स्थानी दंगलवरील रामायण आणि महिमा शनिदेव की हे कार्यक्रम आहेत. तिसऱ्या स्थानावर झी अनमोल वरचा कार्यक्रम कुंडली भाग्य तर चौथ्या स्थानी डीडी नॅशनल वरील श्रीकृष्ण आहे. आणि पाचव्या स्थानावर रक्त संबंध कार्यक्रम आहे जो दंगलवर प्रसारित होतो.
शहरी भागांचा विचार केला तर, पहिल्या स्थानी झी-टीव्हीचा कार्यक्रम कुंडली भाग्य आहे. दुसऱ्या स्थानी स्टार प्लसवरील अनुपमा आणि तिसऱ्या स्थानी सोनी टीव्हीचा तारक मेहता का उल्टा चष्मा हा कार्यक्रम आहे. चौथ्या स्थानावर सोनी वरील इंडियाज बेस्ट डान्सर आहे तर पाचव्या स्थानी कलर्स वरील नागीन-5 आहे.