बहुजननामा ऑनलाईन – टीव्ही अभिनेत्री सुरभी चंदना (Surbhi Chandna) नागिन 5 मध्ये बानी ची भूमिका साकारून खूपच फेमस झाली. ती सोशल मीडियावर कायमच अॅक्टीव्ह असते. आपल्या हॉट फोटो आणि व्हिडीओनं ती कायमच चाहत्यांचं अटेंशन घेत असते. पुन्हा एकदा आपल्या लुकनं ती चर्चेत आली आहे.
सुरभीनं तिच्या इंस्टावरून काही फोटो शेअर केले आहेत. सध्या या फोटोंची सोशलवर जोरदार चर्चा सुरू आहे. लुकबद्दल बोलायचं झालं तर तिनं ब्लॅक कलरचा टॉप आणि हाय वेस्ट जिन्स घातली आहे. नुकताच तिचा बेपनाह प्यार म्युझिक व्हिडीओ रिलीज झाला. त्याला 6 मिलियन्स व्ह्युज मिळाल्याच्या आनंदात तिनं हे फोटो शेअर केले आहेत. कॅप्शनमधून सुरभीनं तशी माहिती दिली आहे. सुरभी या लुकमध्ये खूपच बोल्ड आणि ग्लॅमरस दिसत आहे.
View this post on Instagram
सुरभीचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. चाहत्यांनाही तिचा हा लुक खूप आवडला आहे. अनेकांनी लाईक्स आणि कमेंट करत प्रतिक्रिया दिली आहे. काहींनी हे फोटो शेअरही केले आहेत.
View this post on Instagram
सुरभीच्या वर्कफ्रंटबद्दल बोालायचं झालं तर सध्या काही दिवसांपू्र्वी ती संजीवनी या मालिकेत काम करत होती. 2009 मध्ये सुरभीनं तारक मेहता का उल्टा चश्मा मलिकेत स्वीटीची भूमिका साकारली होती. यानंतर सुरभी 2013 मध्ये एक ननद की खुशियों की चाबी… मेरी भाभी या मालिकेत दिसली. यानंतर तिनं कुबूल है, आहट, इशकबाज, दिल बोले ओबेरॉय अशा अनेक मालिकेत काम केलं. नागिन 5 या मालिकेतही तिनं भूमिका साकराली आहे. बॉबी जाजूस या सिनेमातही सुरभी झळकली आहे.
View this post on Instagram
View this post on Instagram
View this post on Instagram