मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – टीव्हीवरील सुंदर नागिन ॲक्ट्रेस निया शर्मा (Nia Sharma) फक्त अभिनय नाही तर आपल्या सौंदर्यासाठीही ओळखली जाते. निया युथमध्ये खूपच फेमस आहे. जेव्हा फॅशन इंडस्ट्रीबद्दल बोललं जातं तेव्हा नियाचं नाव येणार नाही असं होतच नाही. निया आपल्या हॉट लुकमुळेही अनेकदा चर्चेत आली आहे. नियाचे बोल्ड बिकीनीतील फोटो सोशलवर खूपदा व्हायरल झाले आहेत. पुन्हा एकदा नियानं सोशलवर साऱ्यांचं लक्ष वेधलं आहे.
नियानं तिच्या इंस्टावरून काही फोटो शेअर केले आहेत. हे फोटो सध्या चर्चेत आले आहेत. या फोटोची खासियत अशी की या फोटोत तिचा खूपच बोल्ड आणि हॉट अवतार दिसत आहे. नियाचे एक्सप्रेशन नेहमीप्रमाणे लक्ष वेधून घेत आहेत. चाहत्यांना तिचा अवतार खूप आवडला आहे.
https://www.instagram.com/p/CIqYskjB6cx/
लुकबद्दल बोलायचं झालं तर तिनं ब्लॅक अँड गोल्ड कलरची बिकिनी घातली आहे. सध्या निया गोव्यात आहे. तिचे हे फोटो तिथलेच आहेत. फोटो शेअर करताना तिनं खास कॅप्शनही दिलं आहे.
सध्या नियाचे हे फोटो सोशलवर व्हायरल होताना दिसत आहेत. फोटोत निया तिची किल्लर फिगर फ्लाँट करताना दिसत आहे. चाहत्यांनी तिच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडला आहे.
काहींनी नियाच्या फोटोंवर कमेंट करत मिर्झापूर सीरिजमधला डायलॉग वापरत हेही ठिक आहे असं म्हटलं आहे. चाहत्यांसोबतच काही सेलेब्सनंही यावर कमेंट केल्या आहेत.
नियाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, लवकरच निया रवि दुबेचा सुपरहिट शो जमाई राजा 2.0 मध्ये वापसी करणार आहे. 2010 साली आलेल्या काली : एक अग्निपरीक्षा या मालिकेतून तिनं आपल्या करिअरला सुरुवात केली होती. एक हजारों में मेरी बहना है आणि जमाई राजा या मालिकांनी तिला खूप लोकप्रियता मिळाली आहे. नागिन 4 मालिकेतही तिनं काम केलं आहे. फियर फॅक्टर, खतरों के खिलाडी सिजन 8 मध्ये निया दिसली होती. याशिवाय नियानं ट्विस्टेड(Twisted) या वेब सीरिजमध्येही काम केलं आहे.
https://www.instagram.com/p/CFkgQhNhrBx/