बहुजननामा ऑनलाईन टीम : कौन बनेगा करोडपती (Kaun Banega Crorepati) चा सध्या 12 वा सीझन सुरू आहे. आजची गेम गेल्या रात्रीची रोल ओव्हर कंटेस्टेंट रचना त्रिवेदी (Rachana Trivedi) पासून सुरू झाली. बिग बी अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी सांगितलं की, रचना गुजरातच्या राजकोटची रहिवाशी आहे. रचनानं अमिताभला तिची स्टोरी सांगू चकितच केलं.
तिनं सागितलं की, तिला फिरायला खूप आवडतं. यामुळं ती 12 देश फिरली आहे. ती जर्मनीत बिजनेस मॅनेजर म्हणून पोस्टेड आहे. रचना त्रिवेदीनं आजची गेम 6 व्या प्रश्नापासून सुरू केली. तिच्या 3 लाइफलाइन शिल्लक होत्या.
काही प्रश्नांची बरोबर उत्तरं दिल्यानंतर रचना सनी लिओनी (Sunny Leone) च्या नावावर कन्फ्यूज झाली आणि तिनं या प्रश्नाचं चुकीचं उत्तर दिलं. रचनाला विचारण्यात आलं होतं की, राष्ट्रीय डेअरी विकास बोर्डचं मुख्यालय भारतात कुठं आहे?
याचं तिनं बरोबर उत्तर दिलं – आणंद
यानंतर तिला विचारण्यात आलं की, हरनीत कौर (Harneet Kaur) ला आपण कोणत्या नावानं ओळखतो. या प्रश्नाचं मात्र रचनानं चुकीचं उत्तर दिलं सनी लिओनी. अमिताभ यांनी याचं बरोबर उत्तर सांगितलं नीतू कपूर (Neetu Kapoor).
चुकीचं उत्तर दिल्यानंतर रचना गेममधून आउट झाली आणि 3 लाख 20 हजार रुपये जिंकून घरी गेली.