बहुजननामा ऑनलाईन- काळ्या समुद्रात तुर्कीला उर्जाचा मोठा साठा मिळाला आहे. हे साठे बहुधा नैसर्गिक वायूचे आहेत. तुर्कीच्या गॅस साठ्यांच्या शोध मोहिमेशी संबंधित दोन व्यक्तींनी ब्लूमबर्गला ही माहिती दिली आहे. तुर्कीच्या राष्ट्राध्यक्षांनीही याबाबत संकेत दिले आहेत.
शुक्रवारी देशवासीयांना आनंदाची बातमी देण्याचे आश्वासन तुर्कीचे राष्ट्रपति रॅचप तैय्यप एर्दवान यांनी दिले आहे. ही बातमी देशात नव्या युगाला सुरुवात करेल, असे तुर्कीचे राष्ट्रपति म्हणाले. तसेच, एर्दवानने भूमध्य समुद्राच्या वादग्रस्त पाणलोट क्षेत्रातील उर्जेच्या साठा शोधण्याचा प्रयत्न सुरू केल्याने युरोपीयन संघाबरोबरचा वाद आणखी तीव्र झाला आहे.
तुर्कीच्या राष्ट्राध्यक्षांनी केलेल्या घोषणेनंतर तुर्की लीरामध्ये डॉलरच्या तुलनेत वाढ झाल्याचं दिसत आहे. तुर्की पेट्रोल रिफाइनरीलेरी एएस (तुप्रास) और पेट्रोलियम मैन्युफैक्चरर पेटकिम पेट्रोकिमया होल्डिंग चे शेयर्सच्या किंमतीमध्ये 7.6 आणि 9.9 टक्क्यांनी वाढ झाली.
तुर्कीचे ऊर्जामंत्री फातिह डोनेजे म्हणाले की, गेल्या महिन्यात ड्रिलिंग जहाज फातिहने तुर्कीच्या एरागील जवळील किनारपट्टीच्या भागात टूना -1 झोनमध्ये खोदण्यास सुरुवात केली. ब्लूबे एसेटचे रणनीतिकार तिमोथी एश यांनी ट्विटरवर लिहिले आहे की, “काळ्या समुद्रामध्ये यापूर्वी पण मर्यादित प्रमाणात गॅस साठा सापडला होता.” तुर्कीचे वार्षिक तेल-गॅस आयातीचे बिल 35 – 50 अब्ज डॉलर्स दिले तर कोणतेही मोठे साठे सापडल्यास तुर्कीचे भविष्य बदलू शकेल.
टुना -1 तुर्की किनारपट्टीपासून सुमारे 150 किमी अंतरावर आहे आणि बल्गेरिया आणि रोमानियाच्या सागरी सीमेजवळ आहे. हे क्षेत्र रोमानियाच्या नेप्चून ब्लॉकपासून फारसे दूर नाही. नेप्टून ब्लॅक हा काळा समुद्रामध्ये आठ वर्षांपूर्वी सापडलेला एक मोठा गॅस जलाशय आहे. तुर्की नेव्हीच्या वेबसाइटनुसार, तुर्कीचे ड्रिलिंग जहाज फातिह जुलैपासून टूना -1 मध्ये खोदत आहे.
रोमानिया सध्या कमी खोलीच्या गॅस साठ्यावर काम करीत आहे, तर 8 वर्षांपूर्वी सापडलेला विशाल साठा अद्याप टॅप केला गेलेला नाही. 2021 पर्यंत गॅस निर्मितीचे लक्ष्य ठेवून रोमानियाच्या किनारपट्टीवरही एक कंपनी शोध प्रक्रियेत गुंतलेली आहे.
मर्केल एनर्जी कन्सल्टन्सीचे व्यवस्थापकीय संचालक क्रिस्टोफ मर्केल म्हणाले की, “तिथून कुठलाही साठा मिळण्याची बातमी फार आश्चर्यकारक आहे असे मला वाटत नाही.” जर तुर्कीने हा गॅस निर्यातीचा विचार केला तर बल्गेरिया, युक्रेन आणि ग्रीससुद्धा त्यात फार रस घेतील.
टर्कीचा हा शोध अशा वेळी आला आहे जेव्हा ग्रीस आणि सायप्रसबरोबरचा त्याचा भूमध्यपूर्व भागात वाद सुरू आहे. या भागात तुर्कीने तेल आणि गॅसच्या साठ्यावरील मोहीम अधिक तीव्र केली आहे. टर्कीला आळा घालण्यासाठी फ्रान्सने आपली लष्करची उपस्थिती देखील तात्पुरती वाढविली आहे. जर्मन चांसलर अँजेला मर्केल यांनी बुधवारी सांगितले की, युरोपियन युनियन या भागात वाढत्या तणावाची चिंता करीत आहे.
गेल्या आठवड्यात ग्रीसने इजिप्तबरोबर सागरी परिसीमन कराराची घोषणा केली, त्यानंतर जर्मनीच्या मध्यस्थीमुळे ग्रीस-तुर्की चर्चा अयशस्वी झाली. या घडामोडींमधे तुर्कीने भूमध्य सागरात पुन्हा तेल-गॅस साठा शोधण्याची मोहीम हाती घेतली आहे. युरोपियन युनियनच्या दबावामुळे आपण आपले विचार बदलणार नसल्याचे तुर्कीचे राष्ट्रअध्यक्ष एर्दवान यांनी सांगितले.
भूमध्य बेटांमधील गॅस-तेल साठ्यांच्या दाव्यांवरून तुर्कीबरोबर सायप्रसचा सर्वाधिक वाद आहे. रिपब्लिक ऑफ सायप्रस हा युरोपियन युनियनचा सदस्य देश आहे आणि संपूर्ण बेटावर अधिकृत संप्रुभता राखून आहे. तसेच, 1974 मध्ये लष्करी मोहिमेनंतर तुर्कीने त्याचा उत्तरी भाग ताब्यात घेतला. तुर्की रिपब्लिक ऑफ नॉर्दर्न सायप्रस, स्व:घोषित सार्वभौमत्वला केवळ तुर्कीकडून मान्यता आहे. जगातील कोणताही देशाने मान्यता दिलेली नाही. नॉर्दर्न सायप्रस समुद्री उर्जा स्त्रोतांवरील त्याचेही अधिकार असल्याचे ठामपणे सांगत आहेत.
युरोपियन युनियनच्या नेत्यांनी पूर्व भूमध्यसागरच्या परिस्थितीविषयी चर्चा करण्यासाठी सप्टेंबरमध्ये आपातकालीन बैठक बोलवण्याचा निर्णय घेतला आहे. बुधवारी एका व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये सुमारे 27 देशांच्या प्रमुख नेत्यांनी ग्रीस आणि सायप्रसबरोबर एकता दर्शविली आणि या प्रदेशातील अवैध खाणकामांच्या विरोधात निषेध व्यक्त केला.
वास्तविक, तुर्कीचे अध्यक्ष एर्दवान तुर्कीला प्रादेशिक सत्ता म्हणून प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करीत आहेत. सिरिया, लिबियामधील संघर्षापासून ते इराकमधील आक्रमणापर्यंत, नाटोच्या दुसर्या क्रमांकाच्या लष्कराच्या सदस्या असलेल्या तुर्कीने आपली ड्रोन, युद्ध विमाने आणि टाक्यांद्वारे हस्तक्षेप केला आहे. भूमध्य देशांनी संघटित व्हावे व त्यांचे वाद मिटवावेत असे आवाहनही एर्दवान यांनी केले आहे.
एर्दवान यांनी बुधवारी सांगितले की भूमध्य सागरी देशातील तुर्कीचा संघर्ष हा त्याच्या हक्कांबद्दल नाही तर भविष्याबद्दल आहे. तुर्की नौदलाने म्हटले आहे की त्याने सायप्रसच्या वायव्य भागात लष्करी सराव सुरू केले आहेत.