Tunisha Sharma Death | तुनिषाच्या आत्महत्येनंतर सहकलाकार शीझान खानने केला ‘हा’ मोठा खुलासा

बहुजननामा ऑनलाईन – सध्या अलीबाबा फेम अभिनेत्री तुनिषा शर्मा (Tunisha Sharma Death) हिने टीव्ही सेटवर गळफास लावून आत्महत्या केल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. तुनिषाने वयाच्या विसाव्या वर्षी एवढे मोठे पाऊल उचलल्याने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. तिच्या आत्महत्या नंतर तिचा सहकलाकार शीझान खानला चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर यावेळी तुनिषाला (Tunisha Sharma Death) आत्महत्या करण्यास प्रवृत्त करण्यामागे शीझान खानचाच हात असल्याचे आरोप तुनिषाच्या आईने केले होते. तर यादरम्यान शीझान खानला ताब्यात घेतल्यानंतर आता त्याने मोठा खुलासा केला आहे.
चौकशी दरम्यान शीझान मोहम्मद खान याने पोलिसांना सांगितले की तुनिषाने या आधी देखील आत्महत्येचा प्रयत्न केला होता. मात्र त्यावेळी तिला शीझाननेच वाचवले होते आणि या विषयाची माहिती शीझानने तुनिषाच्या आईला देखील दिली होती.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
तुनिषाच्या (Tunisha Sharma Death) मृत्यू आधीच नुकतेच शीझान आणि तुनिषाचे ब्रेकअप झाले होते.
या तणावामुळेच तिने हे मोठे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे.
मात्र पोस्टमॉर्टम रिपोर्ट मध्ये कुठलाही बळजबरी झाल्याची चिन्हे नाही आहेत.
तर पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत. अलिबाबा या मालिकेशिवाय तुनिषाने फितुर, बार बार देखो,
कहानी-2 दुर्गा राणी सिंग आणि दबंग-3 या चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या होत्या.
Web Title :- Tunisha Sharma Death | tunisha had attempted suicide before sheezan khans disclosure to the police
हे देखील वाचा :
Manushi Chhillar | ख्रिसमस स्पेशल लुकमध्ये मानुषी दिसतीय एकदम कडक; प्रेक्षक करत आहेत कौतुक
Pune Water Supply | गुरुवारी पुणे शहरातील ‘या’ भागाचा पाणीपुरवठा बंद राहणार
Comments are closed.