बहुजननामा ऑनलाईन – अलीबाबा फेम अभिनेत्री तुनिषा शर्माने (Tunisha Sharma Death) वयाच्या विसाव्या वर्षीच मालिकेच्या सेटवरच गळफास घेत आत्महत्या केली होती. तिच्या आत्महत्या नंतर पोलिसांनी तिचा सहकलाकार आणि बॉयफ्रेंड शिझान खानला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. तर तुनिषाला (Tunisha Sharma Death) असे करण्यास शिझाननीच भाग पाडल्याचा दावा तुनिषाच्या आईने केला आहे. तर आता या प्रकरणी आणखीन एक मोठा खुलासा तुनिषाच्या जवळच्या मैत्रिणीने केला आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
तुनिषाने जेव्हा आत्महत्या केली तेव्हा ती गर्भवती असल्याच्या चर्चा सुरू होत्या. एका मुलाखतीत तुनिषाची मैत्रीण अभिनेत्री राया लबीबने यावर मोठे वक्तव्य केले आहे . यावेळी राया म्हणाली की, “तुनिषा गर्भवती असण्याची शक्यता नाकारता येत नाही कदाचित ती तिच्या मृत्यू वेळी गर्भवती नसावी पण याआधी ती गरोदर राहिली आणि गोळ्या खाऊन तिने तिचा गर्भपात केला असावा मला हे नक्की माहित नाही पण काही दिवसांपासून ती खूपच काळजीत वाटत होती”.
पुढे बोलताना राया म्हणाली, “तुनिषा (Tunisha Sharma Death) शिझानवर खूप प्रेम करायची.
तिला त्याच्याशी लग्न करायचे होते. मात्र तिच्या प्रेग्नेंसी बद्दल मी शंभर टक्के खात्री सांगू शकत नाही आणि
ती शक्यताही नाकारता येत नाही कारण ती गर्भवती असणे हेच तिच्या आणि शिझानच्या भांडणाचे मोठे कारण
होते”. सध्या रायाच्या या वक्तव्याने एकच खळबळ उडाली आहे.
Web Title :- Tunisha Sharma Death | rayya labib claims tunisha sharma could have been pregnant abortion by consuming pills fight with sheezan khan
हे देखील वाचा :