पाटणा : बहुजननामा ऑनलाईन – बिहार विधानसभेचे विरोधी पक्षनेते व माजी उपमुख्यमंत्री राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांचे पुत्र तेजस्वी यादव यांनी सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. माझे वडील लालू प्रसाद यादव हे आजारी आहेत. त्यांना भेटण्यासाठी गेलो असता. मला भेटण्याची अनुमती दिली गेली नाही. असा आरोप तेजस्वी यांनी केला आहे.
लालू प्रसाद यादव हे १९९६ मध्ये मुख्यमंत्री असताना हा घोटाळा झाला होता. माजी मुख्यमंत्री जगनाथ मिश्रा यांचाही सहभाग ह्या चारा घोटाळ्यात होता. हा घोटाळा ९५० कोटींचा होता. लालू प्रसाद सध्या चारा घोटाळ्याप्रकरणी शिक्षा भोगत आहेत. त्यांची शारीरिक परिस्थिती ढासळल्याने त्यांच्यावर रांची येथील रुग्णालयामध्ये उपचार सुरु आहेत.
तेजस्वी यादव हे रविवारी रांची येथे आपल्या आजारी वडिलांना भेटण्यासाठी गेले होते. परंतु त्यांना सकाळपर्यंत लालू प्रसाद यादवांना भेटू दिले नाही. तुरुंगाच्या नियमांप्रमाणे जर सुप्रीटेंडेंट ऑफ पोलीस अधिकाऱ्याची परवानगी असेल तर कैद्याच्या कुटुंबियांना भेटण्याची अनुमती दिली जाते. मात्र मला माझ्या वडिलांना भेटण्याची परवानगी देण्यात आली नाही.