नवी दिल्ली : बहुजननामा ऑनलाईन – आगामी लोकसभेत उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेस भाजपला टक्कर देण्याच्या स्थितीत नाही. यासाठी सप-बसप आणि इतर पक्षांच्या आघाडीलाच (महाआघाडी) मतदान करा,’ अशा शब्दांत ‘मुस्लीम समाजाला आवाहन केलं आहे.बसपा अध्यक्ष मायावतींनी उत्तर प्रदेशातील सहारनपूर येथील देवबंद येथे मुस्लीम समाजाला थेट मते मागितली होती. ही सप-बसप आणि रालोदची पहिलीच संयुक्त प्रचारसभा होती. या वक्तव्यामुळे मायावती वादात अडकण्याची शक्यता आहे.
देवबंद येथील भाषणामध्ये मायावतींनी थेट मुस्लिम समाजाला संबोधित करत आघाडीला मतदान करा , असे म्हटले होते. उत्तर प्रदेशच्या मुख्य निवडणूक आयुक्तांनी याची दखल घेत स्थानिक प्रशासनाला अहवाल मागितला आहे. ‘मुस्लीम समाजाने कोणत्याही भूलथापांना बळी न पडता केवळ महाआघाडीलाच मतदान केले तर, भाजपला सत्तेतून हटवता येईल,’ असे मायावती यांनी म्हटले होते.’काँग्रेसने विशिष्ट जातींच्या आणि धर्मांच्या लोकांना जाणूनबुजून उमेदवारी दिली आहे. यात काँग्रेसची मोठी राजकीय चाल आहे. ‘काँग्रेस निवडून येवो किंवा न येवो; मात्र, हे युती सरकार निवडून येऊ नये,’ अशी काँग्रेसची इच्छा आहे,’ असा आरोप मायावतींनी केला होता.असे झाल्यास त्याचा फायदा भाजपला होईल,’ असे थेट वक्तव्य मायावतींनी केले होते. मात्र, यामुळे मायावतीसमोरच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.