नवी दिल्ली : वृत्तसंस्था – काही मीडिया रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे की, अलिकडे कोरोना (COVID-19) ने संक्रमित रूग्णांमध्ये टीबीची प्रकरणे वाढल्याचे दिसून आले आहे, ज्यातून रोज सुमारे डझनभर प्रकरणे समोर येत असल्याने डॉक्टरसुद्धा चिंताग्रस्त आहेत. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने (MoHFW) सर्व कोरोना संक्रमित रूग्णांसाठी टीबी (Tuberculosis) ची चाचणी आणि सर्व डायग्नोस्ड केलेल्या टीबी (Tuberculosis) रूग्णांसाठी कोविड चाचणीची शिफारस केली आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना सांगण्यात आले आहे की, त्यांनी ऑगस्ट 2020 पर्यंत चांगली देखभाल आणि टीबी तसेच कोविड-19 च्या प्रकरणांचा शोध घेण्यासाठी प्रयत्नात एकरूपता आणावी.
याशिवाय, TB-COVID आणि TB-ILI/SARI च्या द्वि-दिशात्मक चाचणीची (Bi-directional screening) आवश्यकता सांगत आरोग्य मंत्रालयाकडून अनेक सल्ले आणि मार्गदर्शन जारी करण्यात आले आहे. अनेक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांनी ते लागू सुद्धा केले आहेत.
कोरोनामुळे का झाली TB मध्ये वाढ
कोरोना महामारीमुळे अनेक प्रतिबंधांमुळे, 2020 मध्ये टीबीसाठी केस नोटिफिकेशनमध्ये सुमारे 25% ची घट
आली होती, परंतु सर्व राज्यांद्वारे समाजात ओपीडी सेटिंग्समध्ये केस फायंडिंगसह अॅक्टिव्ह केस फायंडिंग
अभियानाच्या माध्यमातून हा प्रभाव कमी करण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत.
तसेच, सध्या हे सांगण्याइतके सबळ पुरावे नाहीत की, कोरोनामुळे टीबीच्या प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे
किंवा केस शोधण्याच्या प्रयत्नांमध्ये वाढ केल्याने टीबीच्या प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे.
Web Titel :- tuberculosis mohfw has recommended tuberculosis tb screening for all covid 19 positive patients and covid 19 screening for all diagnosed tb patients
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Today petrol price | एक दिवसाआड पेट्रोलच्या दरात वाढ !
Mumbai |DRI कडून लक्झरी कार ‘तस्करी’च्या रॅकेटचा केला ‘पर्दाफाश’
Ramdas athavle | …शरद पवार निवडून येणार नाहीत, त्यांना बळीचा बकरा करू नये