पिंपरी : बहुजननामा ऑनलाईन – Pimpri Chinchwad Crime Branch Police | शासनाने प्रतिबंधित केलेला गुटख्याचा साठा (gutkha seized) पिंपरी चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या (Pimpri Chinchwad Crime Branch Police) अमली पदार्थ विरोधी पथकाने (anti narcotics cell) जप्त केला आहे. पोलिसांनी केलेल्या कारवाईत 3 लाख 70 हजार 711 रुपयांचा गुटखा जप्त केला. ही कारवाई शुक्रवारी (दि.16) दुपारी दापोडी येथे करण्यात आली. आरोपींवर भोसरी पोलीस ठाण्यात (Bhosari Police Station) गुन्हा दाखल करुन 2 जणांना अटक (Arrest) करण्यात आली आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
गोट्या उर्फ शरद अगरवाल (रा. रास्ता पेठ, पुणे) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर मिश्रीलाल समाराम परिहार (वय-40 रा. जयभीमनगर, दापोडी), सचिन कलाधर (रा. वडारवाडी, पुणे) यांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस हवालदार प्रदीप छबु शेलार यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी परिहार याने शासनाने प्रतिबंधित केलेल्या गुटख्याचा साठा करुन
ठेवला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे यश सहकारी गृहरचना येथील
एका घरावर छापा टाकला. त्यावेळी एका खोलीत पोलिसांनी वेगवेगळ्या कंपनीचा शासनाने प्रतिबंधित केलेला
गुटखा, सुगंधीत तंबाखू व पान मसाला आढळून आला. पोलिसांनी एका मोपेडसह सर्व मुद्देमाल जप्त केला.
आरोपींविरोधात भोसरी पोलीस ठाण्यात (Bhosari police station) विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक साबळे करित आहेत.
Web Titel :- pimpri chinchwad crime branch police gutka worth rs 3 75 lakh seized in dapodi 2 arrested
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Pune Crime | पुणे पोलिसांकडून फसवणूक केल्याप्रकरणी बिल्डरला अटक, जाणून घ्या प्रकरण