भंडारा : बहुजननामा ऑनलाईन – नागपूर विभागातील अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांतील युवकांना सैन्य, पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण देण्यासाठी श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ, अमरावती या संस्थेतर्फे प्रशिक्षण ३ महिने कालावधीचे राहील. त्यात नास्ता, जेवणाची व निवासाची व्यवस्था संस्थेमार्फत करण्यात येईल.
प्रशिक्षणस्थळी उमेदवारास स्व:खर्चाने हजर व्हावे लागेल. इच्छुक उमेदवारांनी १५ मार्चपयंर्त अर्ज सादर करावे. पात्रता पूर्ण करणाऱ्या अनुसूचित जातीच्या उमेदवारांनी सदर प्रशिक्षणासाठी सहाय्यक आयुक्त, सामाजिक न्याय भवन, भंडारा येथे अर्ज सादर करावे. मागासवर्गीय उमेदवारांच्या कौशल्यात वाढ होऊन त्यांना रोजगाराच्या संधी प्राप्त करण्याकरिता ही योजना आहे. उमेदवारांना प्रशिक्षणासाठी या कार्यालयातर्फे पाठविण्यात येत असले तरी उमेदवारांनी प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर नोकरीसाठी स्वत: प्रयत्न करणे आवश्यक आहे, असे साहाय्यक आयुक्त समाजकल्याण यांनी कळविले आहे.