बहुजननामा ऑनलाईन : रक्तदाब किती आहे हे जाणून घेण्यासाठी आपल्याला डॉक्टरकडे जाण्याची गरज नाही. टोरोंटो युनिव्हर्सिटीच्या शोधकर्त्यानी मोबाइल फोन कॅमेऱ्यांमधून बीपी जाणून घेण्याचा एक नवीन मार्ग विकसित केला आहे. त्याअंतर्गत सेल्फी व्हिडिओच्या मदतीने रक्तदाब ओळखला जात आहे. चीन आणि कॅनडामधील १३२८ नागरिकांवर याविषयी संशोधन करण्यात आले असून ९० ते ९५ टक्के योग्यतेसह तीन प्रकारच्या ब्लड प्रेशर तपासणीमध्ये यश आले आहे.
१] टोरोंटो विद्यापीठातील संशोधक पॉल झेंग यांनी ट्रान्सडर्मल ऑप्टिकल इमेजिंग तंत्रज्ञान विकसित केले आहे. या तंत्राच्या सहाय्याने चेहर्याच्या त्वचेद्वारे रक्तदाब शोधला जाऊ शकतो. हे समजण्यासाठी संशोधकांनी २ मिनिटाचा सेल्फी व्हिडिओचा वापर केला आहे.
२] व्हिडिओ बनवताना, मोबाइल कॅमेऱ्याला लावलेले ऑप्टिकल सेन्सर चेहर्यावरील लाल किरण हस्तगत करतात जे त्वचेखालील हिमोग्लोबिनमुळे प्रतिबिंबित होते. ट्रान्सडर्मल ऑप्टिकल इमेजिंग तंत्र या प्रतिबिंबित किरणांच्या मदतीने शरीरात रक्तदाबची माहिती देते. शोधकर्त्यांचा असा दावा आहे की हे तंत्र 96 टक्के अचूक परिणाम देते.
३] शोधकर्त्यांचा मते, ट्रान्सडर्मल ऑप्टिकल इमेजिंगमुळे जगात उच्च रक्तदाब (हाय बीपी) कमी होण्यास मदत होईल. ज्या ठिकाणी आरोग्य सुविधा लवकर उपलब्ध होऊ शकत नाही त्या ठिकाणी हे मोठ्या प्रमाणात उपयोगी ठरणार आहे. त्यामुळे तुमच्याकडे मोबाइल किंवा कॅम्प्युटर असल्यास तुम्ही त्याची तात्काळ बातमी डॉक्टरांना देऊ शकता.
४] न्यूरालॉजिक्स या कंपनीने एनुरा नावाचे एक ऍप लॉन्च केले असून याद्वारे तुमच्या तीस मिनिटाच्या सेल्फी व्हिडीओद्वारे तणाव आणि हृदयाच्या ठोक्यांचा अचूक अंदाज लावणार आहेत. लवकरच याला चीनमध्ये लॉन्च केले जाणार असून लवकरच जगभरात उपलब्ध करून दिले जाणार आहे.