मुंबई : बहुजननामा ऑनलाइन -हैदराबाद गँगरेप मधील चार आरोपींचा पहाटे एन्काऊंटर करण्यात आला. राष्ट्रीय महामार्ग 44 जवळ झालेल्या या थरार नाट्यात आरोपींचा खात्मा करण्यात आला. त्यानंतर साईबराबाद पोलीस आयुक्त सज्जनार यांची सोशल मीडियात वाहवा झाली. त्यांना एन्काऊंटर स्पेशालिस्ट मानले जाऊ लागले. मात्र, सज्जनार हे एन्काऊंटर स्पेशालिस्ट नाहीत तर हे आहेत देशातील Top चे एन्काऊंटर स्पेशालिस्ट
सचिन वाजे (मुंबई पोलीस)
सचिन हिंदुराव वाजे यांनी 1990 मध्ये आपले पोलीस दलात कामाला सुरुवात केली. त्यांनी 2007 मध्ये नोकरी सोडून दिली. मुंबई पोलीस दलात त्यांनी काम केले. एन्काऊंटर स्पेशालिस्ट म्हणून ते महारष्ट्रात सर्वाधीक चर्चेत राहिले. त्यांनी एकूण 63 एन्काऊंटर केले आहेत.
दया नायक (मुंबई पोलीस)
दया नायक यांनी 1995 मध्ये मुंबई पोलीस दल जॉईन केले. त्यांनी अत्तापर्य़ंत 83 गुन्हेगारांचा एन्काऊंटर केला आहे. मुंबई तपास यंत्रणेत काम करणारे दया नायक यांना 2006 मध्ये बेहिशोबी मालमत्ता आणि लाच प्रकरणात निलंबित करण्यात आले.
दिवंगत विजय साळसकर ( मुंबई पोलीस)
विजय साळसकर यांनी मुंबई पोलीस दलात राहून वेगवेळ्या कारवाईत 90 गुन्हेगारांचा एन्काऊंटर केला. साळसकर यांचा मुंबई मध्ये 2008 साली झालेल्या हल्ल्यात दहशतवाद्यांशी लढताना मृत्यू झाला.
रविंद्र आंग्र (मुंबई पोलीस)
रविंद्र आंग्रे यांची ठाण्यातील ऑर्गेनाईज माफियांना संपवण्यात महत्वाची भूमिका होती. त्यांनी सुरेश गँगचा पूर्णपणे खात्मा केला होता. रविंद्र आंग्रे यांनी आपल्या कार्य़काळात 50 कुख्यात गुन्हेगारांचा एन्काऊंटर केला आहे.
प्रफुल्ल भोसले (मुंबई पोलीस)
प्रफुल्ल पटेल हे आपल्या तपास आणि गुन्हेगाराच्या एन्काऊंटरमुळे प्रकाश झोतात आले. त्यांना एन्काऊंटर स्पेशालिस्ट म्हणून ओळखले जाऊ लागले. त्यांची दहशतवाद्यांमध्ये दहशत होती. या पोलीस अधिकाऱ्याने 90 कुख्यात गुन्हेगारांचा एन्काऊंटर करून केला आहे.
प्रदिप शर्मा (मुंबई पोलीस)
मुंबई पोलीस दलातील एक जांबाज पोलीस अधिकारी म्हणून प्रदिप शर्मा यांची ओळख आहे. प्रदिप शर्मा यांनी आत्तापर्य़ंत 113 गुन्हेगारांचा एन्काऊंटर केला आहे. त्या व्यतिरीक्त 312 गुन्हेगारांचा एन्काऊंटर कण्याच्या कारवाईत त्यांनी महत्वाची भूमिका आहे.
Visit : bahujannama.com