फ्रान्स : वृत्तसंस्था – एक टॉप सर्जन 250 मुलांचं लैंगिक शोषण केल्याप्रकरणी संशयित आरोपी आहे. सदर प्रकरण फ्रान्समधील जॉनजॅकमधील आहे. 66 वर्षीय डॉक्टर जोल स्कॉरनेकवर आरोप आहे की त्याने जवळपास 3 दशकांपर्यंत मुलांसोबत लैंगिक हिंसा केली आहे. सर्जरीनंतर बेशुद्धीचं औषध देत लैंगिक हिंसा करण्यात आली आहे.
याच डॉक्टरला 14 वर्षांपूर्वी मुलांसोबत यौन हिंसेचे फोटो ठेवण्याच्या गुन्ह्यात दोषी ठरवण्यात आलं आहे. परंतु 2017 पर्यंत त्याला प्रॅक्टीस करण्याची परवानगी सरकारने दिली होती. 2017 मध्ये या डॉक्टरला 4 आणि 6 वर्षांच्या दोन मुलींवर रेप केल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. या प्रकरणाकडे फ्रान्समधील मुलांसोबत यौन हिंसेचं सर्वात मोठं स्कँडल म्हणून पाहिलं जात आहे.
सदर आरोपी डॉक्टर पोटाच्या सर्जरीचा स्पेशालिस्ट होता. त्याच्यावर मुलं आणि मुली अशा दोघांचंही लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे. मुलींचा रेप करण्याचे डॉक्टरने नाकारले आहे. परंतु गैरवर्तन करणे मात्र त्याने मान्य केले आहे. सदर डॉक्टरला ताब्यात घेण्यात आलं आहे. तपासात डॉक्टरकडे एक पर्सनल डायरी सापडली आहे. यात 250 मुलांसोबत यौन हिंसा केल्याचा उल्लेख आहे. या मुलांचा शोध सुरु आहे. डॉक्टरचा बचाव करताना वकिलाने म्हटले आहे की, डायरीतील सर्व काही काल्पनिक आहे. अनेक मुलांसोबत बेशुद्ध असतानाच यौन हिंसा झाली आहे. त्यामुळे त्यांना याबद्दल जास्त माहिती नाही.