बहुजननामा ऑनलाईन टीम – चीनने एका हाय-प्रोफाइल प्रकरणात बँकेच्या माजी उच्चपदस्थ अधिकाऱ्याला फाशीची शिक्षा सुनावली आहे. 58 वर्षीय लाई शाओमीन जो कम्युनिस्ट पक्षाचा सदस्य देखील आहे. त्याच्यावर आरोप होता कि, वरिष्ठ बँकिंग नियामक म्हणून काम करताना त्याने 2026 कोटी रुपये लाच म्हणून घेतले होते. कोर्टाने त्याला दोषी ठरवले होते. मिळालेल्या माहितीनुसार, लाइ शाओमीनला 5 जानेवारी रोजी कोर्टाने मृत्युदंड दिला. शुक्रवारी त्याला मृत्यू देण्यात आला. दरम्यान, अद्याप हे स्पष्ट नाही कि, फाशी किंवा कोणत्या पद्धतीने बँकेच्या माजी अधिकाऱ्याला शिक्षा देण्यात आली.
बँकेच्या माजी अधिकाऱ्यावर असाही आरोप आहे कि, त्याने छुप्या पद्धतीने दुसरे कुटुंब सुरू केले होते. आपल्या मूळ कुटुंबापासून वेगळा तो बराच काळ एका महिलेसोबत पती व पत्नी म्हणून राहत होता. त्या महिलेकडून त्याला एक मूलही आहे. लाई शाओमीनने लाच म्हणून 2008 ते 2018 दरम्यान 2026 कोटी रुपये घेतले. शाओमीन चीन हुआरोंग अॅसेट मॅनेजमेंट कंपनीचा अध्यक्षही होता. 5 जानेवारीला टियांजिनच्या सेकंडरी इंटरमीडिएट पीपल्स कोर्टात त्याला मृत्युदंड देण्यात आला.
शाओमीनला फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर सुप्रीम कोर्टाने या निर्णयाचा आढावाही घेतला होता. निर्णयाच्या आढावा घेताना असे दिसून आले की शाओमनने समाजाला जेवढे नुकसान केले आहे ते त्याच्या चांगल्या कामांवर बरेच भारी आहे. या कारणास्तव, त्याची फाशीची शिक्षा कायम ठेवण्यात आली. यापूर्वी शाओमिनचा एक व्हिडिओही प्रसारित करण्यात आला होता ज्यामध्ये तो आपल्या गुन्ह्याची कबुली देताना दिसत आहे. शाओमीनच्या बीजिंगमधील एका अपार्टमेंटचे अनेक भाग रोख रकमेसह सापडल्याचेही सरकारी टीव्ही वाहिनीवर दाखविण्यात आले.