मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – रुपयात झालेली घसरण आणि कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ झाल्याने सोन्याच्या किंमती वाढल्या आहेत. दिल्लीतील सराफा बाजारातील सोन्याचा भाव वाढला आहे. सोन्याच्या किंमतीत 460 रुपयांनी वाढ झाली आहे. सोन्याचा भाव 38860 प्रतिग्रॅम झाला आहे. त्याचबरोबर चांदीची किंमतीतही 1096 रुपयांची वाढ होऊन 1 किलो चांदीची किंमत 47957 रुपये झाली आहे. एचडीएफसी सिक्योरिटीजप्रमाणे डॉलरच्या तुलनेत रुपया घसरला आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात न्यूयॉर्कमध्ये सोनं 1504 डॉलर प्रति औंस तर चांदी 17.87 डॉलर प्रति औंस आहे. भारतीय रुपया एका डॉलरच्या तुलनेत 68 पैसे इतका घटला आहे. रुपया आता 71.60 इतका झाला आहे. कच्च्या तेलाच्या किंमतीतही वाढ झाली आहे.
‘असं’ ओळखा अस्सल सोनं
1) पाण्याची टेस्ट- ही एकदम सोपी पद्धत आहे. एक खोल भांडं घ्या. त्यात पाणी टाका. तुम्ही 2 ग्लास इतकंही टाकू शकता. यात सोन्याचे दागिने बुडवा. जर सोनं तरंगलं तर ते खरं सोनं नाही. तळाला गेलं तरच ते खरं सोनं.
2) दातांची टेस्ट- सोनं घ्या आणि ते दातांमध्ये थोडं दाबून ठेवा. दातांवर निशाणी दिसली तर ते खरं सोनं. सोन्याचे दागिने 24 कॅरटचे नसतात. त्यात इतरही धातू मिसळावे लागतात.
3) चुंबक टेस्ट- तुम्ही चुंबकानेही सोन्याचे परीक्षण करू शकता. चुंबक घ्या आणि सोन्याच्या दागिन्यांना लावून बघा. जर सोनं त्यावर चिकटलं तर ते असली सोनं नाही. खरं सोनं चुंबकाला चिकटत नाही.
4) सिरॅमिक थाळी- बाजारात मिळणाऱ्या पांढऱ्या रंगाच्या थाळीवर सोनं घासा. जर थाळीवर चांगले रंग दिसले तर समजा सोनं खरं आहे. जर थाळी काळी पडली तर समजून जा सोनं खोटं आहे.