औरंगाबाद : बहुजननामा ऑनालईन – आगामी विधानसभा निवडणुका जवळ येत आहेत. सगळे पक्ष आपापल्या तयारीला लागले आहेत. आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युलाही ठरला आहे. अशात आता संभाजी ब्रिगेडही निवडणुकीच्या रिंगणात उतरली आहे. संभाजी ब्रिगेडने आपल्या 14 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. संभाजी ब्रिगेडने यापूर्वी 15 जणांची यादी जाहीर केली होती. मागील 25 वर्षे दुसऱ्यांसाठी लढलो आता स्वत:साठी जिंकण्याकरीता निवडणुका लढवणार असे संभाजी ब्रिगेडने म्हटले आहे. उमेदावारांच्या दुसऱ्या यादीत पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघातून रंजना सुभाष जाधव यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
औरंगाबादमध्ये 15 सप्टेंबर रोजी संभाजी ब्रिगेडच्या संसदीय समितीची बैठक पार पडली. यावेळी प्रदेशाध्यक्ष अॅड. मनोज आखरे आणि महासिचव सौरभ खेडेकर हे उपस्थित होते. यावेळी विधानसभेसाठी उमेदवारांच्या दुसऱ्या यादीवर संभाजी ब्रिगेडने शिक्कामोर्तब केलं. निवडणुकीमध्ये जुन्या व निष्ठावंत कार्यकर्त्यांना प्रथम प्राधान्य देऊन निवडणूक लढवणार असल्याची भूमिका संभाजी ब्रिगेडने घेतली आहे. निवडणूक आयोगाकडून संभाजी ब्रिगेडला शिलाई मशीन अधिकृत चिन्ह मिळाले आहे.
संभाजी ब्रिगेडच्या उमेदवारांची दुसरी यादी-
1. डॉ.प्रशांतकुमार उत्तमराव मावंडे- रिसोड मालेगाव
2. राहुल जयवंतराव बलखंडे – वाशिम
3. अजय पांडुरंगजी धोबे- वणी
4. सुभाष भगवानराव कोल्हे- लोहा-कंधार
5. सूर्यकांत मारुती चंद्रे -देगलूर बिलोली
6. बालाजी जनार्धन आगलावे – मुखेड
7. रमेश तात्याराव गायकवाढ- औरंगाबाद पूर्व
8. डॉ. अमितकुमार गोविलकर -कल्याण पश्निम
9. विकास कृष्णा मुकादम- ओहळा माजिवडा
10. पंढरीनाथ संपत सोंडकर -भार वेल्हा मुळशी
11.रंजना सुभाष जाधव- पुणे कॅन्टोन्मेंट
12. छत्रभुज परमेश्वर देशमुख- माजलगाव-बीड
13. गोविंद निंबाजी पोतंगले- परळी, बीड
14. अभिमन्यू शेषराव पवार- औसा, लातूर