नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिल्लीच्या तिहार जेल प्रशासनाने भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांच्या गैरवर्तनाबाबतचा वैद्यकीय अहवाल दाखल केला आहे. या अहवालात दंत आणि इन्फेक्शन असल्याचे सांगितले आहे. तसेच डॉक्टरांच्या टीमने त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून त्याबाबतचा तपशील कोर्टात दाखल केला जाईल. चंद्रशेखर आझाद यांनी आपली चौकशी एम्समध्ये करण्यासाठी याचिका दाखल केली असून गुरुवारी याची सुनावणी होणार होईल आणि तिहार जेल प्रशासन त्याबद्दलचा अहवाल सादर करेल.
दर्यागंजमधील हिंसाचाराच्या आरोपाखाली चंद्रशेखर यांना तुरुंगात टाकले होते. त्यांना गंभीर आरोग्य समस्या आहेत, अशी माहिती त्यांचे डॉक्टर हरजितसिंग भट्टी यांनी ट्विटद्वारे दिली. चंद्रशेखर यांना दर्यागंज हिंसाचारा प्रकरणी १४ दिवसांची कोठडी सुनावण्यात आली होती. चंद्रशेखर यांना एम्समध्ये दाखल करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी भट्टी यांनी शुक्रवारी रात्री गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे केली होती. त्यावर योग्य उपचार लवकरच उपलब्ध न झाल्यास चंद्रशेखर यांची हृदयगती देखील थांबू शकते, असेही ते म्हणाले.
चंद्रशेखर यांनी सर्वात पहिले बॅक पेन असल्याची तक्रार केली. त्यावर कारागृहातील उपाचारगृहातच उपचार करण्यात आले होते. त्यानंतर त्यांनी खाज सुटल्याची आणि दोन्ही हातांना वेदना झाल्याचीही तक्रार केली असता त्यावरही उपचार केले होते. ४ जानेवारीला उपचार केल्याने दोन्ही डोळ्यांमध्ये जळजळ होत असल्याची आणि डोकेदुखीची तक्रार केली.