मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. मात्र, खातेवाटप होण्यास विलंब झाला. मंत्रिमंडळात स्थान मिळालेल्या सर्व मंत्र्यांना खातेवाटप झाल्यानंतर मंत्र्यांनी आपपल्या खात्याचा पदभार स्विकारला. मात्र, राज्यातील पालकमंत्र्यांच्या बाबतीत तोडगा निघाला नसल्याने पालकमंत्र्यांची घोषणा लांबवणीवर पडली होती. मात्र, आता तीनही पक्षांमध्ये एकमत झाले असून आज राज्यातील पालकमंत्र्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. पुण्याचे पालकमंत्रीपद पुन्हा राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यकडे आले आहे. तर आदित्य ठाकरे यांचीही पालकमंत्रिपदी निवड करण्यात आली आहे.
पालकमंत्र्यांची जिल्हानिहाय यादी जाहीर
पुणे- अजित पवार
मुंबई शहर – अस्लम शेख
मुंबई उपनगर – आदित्य ठाकरे
ठाणे – एकानाथ शिंदे
रायगड – आदिती तटकरे
रत्नागिरी – अनिल परब
सिंधुदुर्ग- उदय सामंत
पालघर – दादाजी भुसे
नाशिक – छगन भुजबळ
धुळे – अब्दुल सत्तार
नंदुरबार – अॅड. के.सी. पाडवी
जळगाव – गुलाबराव पाटील
अहमदनगर – हसन मुश्रीफ
सातारा – शामराव उर्फ बाळासाहेब पाटील
सांगली – जयंत पाटील
सोलापूर – दिलीप वळसे-पाटील
कोल्हापूर- विजय उर्फ बाळासाहेब भाऊसाहेब थोरात
औरंगाबाद – सुभाष देसाई
जालना- राजेश टोपे
परभणी- नवाब मलिक
हिंगोली – वर्षा गायकवाड
बीड – धनंजय मुंडे
नांदेड – अशोक चव्हाण
उस्मानाबाद – शंकरराव गडाख
लातूर – अमित देशमुख
अमरावती – अॅड. यशोमती ठाकूर (सोनवणे)
अकोला- ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू
वाशिम – शंभुराज देसाई
बुलढाणा- डॉ. राजेंद्र शिंगणे
यवतमाळ- संजय राठोड
नागपूर – डॉ. नितीन राऊत
वर्धा – सुनिल केदार
भंडारा – सतेज उर्फ बंटी पाटील
गोंदिया – अनिल देशमुख
चंद्रपूर – विजय वडेट्टीवार
गडचिरोली – एकनाथ संभाजी शिंदे