मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – मुंबईच्या साकीनाका पोलिसांनी तीन बांगलादेशी नागरिकांना पकडले आहे, ज्यांनी बेकायदेशिरपणे मागील आठ वर्षांपूर्वी पश्चिम बंगालच्या सीमेवरून भारतात प्रवेश केला होता आणि मुंबईत रहात होते. या लोकांनी स्वत:ला भारतीय असल्याचे सांगितले. परंतु, पोलिसांनी त्यांना आयएमओ वर इंटरनेट कॉल्सद्वारे बांगलादेशमध्ये आपल्या कुटुंबाशी बोलताना पाहिले होते. पोलिसांनी या अॅपच्या सहाय्याने त्यांच्या घरच्यांशी संपर्क साधून त्यांचे जन्म दाखले मागितले.
या लोकांची नावे मुनीर शेख (44), सैफूल मुस्लिम (27) आणि अब्दुल हलीम (32) अशी आहेत. मुनीर शेख आणि सैफूल मुस्लिम मुंबईमध्ये वेल्डिंगचे काम करतात. तर हलीम फळे विकतो. डीसीपी (झोन एक्स) अंकित गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवारी रात्री साकीनाका पोलिसांच्या अँटी-टेररिस्ट सेल (एटीसी) ने तिघांना अटक केली.
वरिष्ठ निरीक्षक किशोर सावंत यांनी सांगितले की, संशयितांच्या विरोधात सुरू असलेल्या मोहिमेंतर्गत या तिघांना अटक करण्यात आली आहे. पथकाचे नेतृत्व एटीसी अधिकारी हनुमंत धवन यांनी केले. पकडण्यात आलेल्या लोकांनी दावा केला आहे की, ते भारतीय आहेत, परंतु योग्य उत्तर आणि पुरावे त्यांना देता आले नाही. ते भारतात कसे दाखल झाले याचा शोध घेतला जात आहे. पथकाला त्यांच्या मोबाइल कॉल रेकॉर्डमध्ये काहीही मिळाले नाही. पण अॅप तपासले असता आयएमओ अॅपचा उपयोग करून ते आपल्या देशात संवाद साधत असल्याचे दिसून आले. अॅपद्वारे करण्यात आलेल्या व्हिडिओवर लक्ष ठेवणे अशक्य असल्याचे तपास अधिकार्याने सांगितले.
भारतीय पासपोर्ट अधिनियम आणि विदेश अधिनियम अंतर्ग या तिघांवर करवाई करून त्यांना अंधेरी मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेटसमोर हजर करण्यात आले असता त्यांना 19 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली. एका सायबर तज्ज्ञाने नाव न प्रसिद्ध करण्याच्या अटीवर सांगितले की, पोलीस सर्वसामान्यपणे कॉल डेटा रेकॉर्ड आणि व्हॉट्सअपचा तपास करतात. जर त्यांना अशाप्रकारच्या टूल्सची पोलिसांना माहिती नसेल तर नंबर ट्रॅक करणे अवघड होऊ शकते.
Visit : Bahujannama facebook page –
- ‘अॅपल टी’चे हे 4 फायेद वाचून व्हाल थक्क! जाणून घ्या ‘रेसिपी’
- संधिवाताची ‘ही’ आहेत 10 लक्षणे आणि 11 कारणे, जाणून घ्या महत्वाच्या गोष्टी
- रंग आणि आरोग्याचे ‘कनेक्शन’ ! जाणून घ्या ‘या’ 10 रंगांचे तुमच्यावरील परिणाम
- ‘या’ 6 पद्धतीने करा तुमच्या आयुष्यातून तणावाला हद्दपार
- ‘विराट’ आणि ‘सेरेना’नेही केला होता फॉलो, ‘वेगन डाएट’चे हे 6 फायदे जाणून घ्या
- झोपल्यावर घाम येत असल्यास ‘या’ 9 कारणांचा विचार करा