‘आधार’कार्ड वरील नाव, पत्ता आणि जन्म तारीख बदलण्यासाठी UIDAI नं जारी केला नवा नियम, जाणून घ्या

aadhar-Card
January 18, 2020

नवी दिल्ली : वृत्त संस्था – आधार प्रत्येक भारतीयाच्या जीवनातील महत्वपूर्ण डॉक्यूमेंट आहे. यासाठी जरूरी आहे की, तुम्ही तुमच्या आधार कार्डच्या डिटेल्स योग्य ठेवाव्यात. जर तुम्हाला आधारमधील एखादी माहिती अपडेट करायची असेल, आणि करू शकत नसाल तर ही बातमी तुमच्यासाठी खुप महत्वाची ठरू शकते. आधार जारी करणारी संस्था यूनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियाने आधार अपडेशनच्या नियमात काही बदल केले आहेत. आधार कार्डशी संबंधित सेवांसाठी युआयडीएआयने काही शहरांमध्ये सेवा केंद्र सुरू केले आहेत. जेथे लोक जाऊन आधारमध्ये बदल करू शकतात. तुम्ही या केंद्रात जाऊन नवीन आधारही काढू शकता. तसेच पत्ता, नाव आणि जन्म तारीखमध्ये बदल करू शकता.

कोणत्या सेवांसाठी आवश्यक आहे अपॉइन्टमेंट

आधार सेवा केंद्रात सुविधांचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अपॉइन्टमेंट घ्यावी लागते. ही अपॉइन्टमेंट कशासाठी घेतात ते जाणून घेवूयात :

* नवीन आधार काढण्यासाठी
* नाव आणि पत्ता अपडेट करण्यासाठी
* जन्म तारीख अपडेट करण्यासाठी
* मोबाईल नंबर अपडेटसाठी
* ई-मेल आयडी अपडेटसाठी
* जेंडर अपडेट करण्यासाठी
* बायोमेट्रिक अपडेट करण्यासाठी

ही आहे अपॉइन्टमेंट घेण्याची पद्धत

* यासाठी प्रथम (https://uidai.gov.in/) वर जावे लागेल.

* आता यामध्ये My Aadhaar वर क्लिक करा. यानंतर Book An Appointment ऑपशन वर जा.

* आता तुम्हाला येथे सिटी लोकेशनचे ऑपशन दिसेल, ज्यामध्ये शहर निवडावे लागेल. शहर निवडल्यानंतर तुम्हाला Proceed To Book Appointment वर क्लिक करावे लागेल.

* आता नवी पेज उघडेल. यामध्ये तीन ऑपशन आहेत. न्यू आधार, आधार अपडेट आणि मॅनेज अपॉइंटमेंट. तुमची तुमच्या गरजेनुसार यातील ऑपशन निवडा. जर तुम्ही आधार अपडेट ऑपशन निवडले आणि रजिस्टर्ड मोबाइल नंबर, कपाचा कोड आणि ओटीपी टाकलात, तर तुमचे अ‍ॅप्लीकेशन व्हेरीफाय होईल.

* ओटीपी व्हेरिफिकेशन झाल्यानंतर येथे दिलेल्या फॉर्ममध्ये आपल्या डिटेल भरा. या फॉर्ममध्ये अपॉइन्टमेंटसंबंधी डिटेल विचाल्या जातात. या डिटेल भरल्यानंतर तुम्हाला बुकिंग अपॉइन्टमेंटसाठी टाइम स्लॉट निवडावा लागेल.

* आता शेवटच्या पायरीमध्ये अपॉइन्टमेंट डिटेल्स तपासा, जर बदल करायचा असेल तर प्रीव्हियस टॅबवर क्लिक करा अन्यथा सबमिट बटन वर क्लिक करा. ऑनलाईन अपॉइन्टमेंट बुकिंग प्रोसेस पूर्णपणे मोफत आहे.

Visit : Bahujannama facebook page –