बहुजननामा ऑनलाइन – माजी मंत्री गिरीश महाजन(girish mahajan) आणि रामेश्वर नाईक यांच्यासोबत मी अनेक वर्षे होतो त्यामुळे त्यांची सगळी गुपिते मला माहित आहेत. मात्र आता मी भाजप सोडून राष्ट्रवादीत प्रवेश केल्यामुळे दोघांकडून मला ठार मारण्याच्या धमक्या देण्यात येत आहे अशी तक्रार जामनेर येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते प्रफुल्ल लोढा यांनी पोलीस अधीक्षकांकडे केली आहे. तसेच प्रफुल्ल लोढा यांनी गिरीश महाजन(girish mahajan) आणि रामेश्वर नाईक यांची चौकशी करण्याची मागणी केली आहे. तसेच लोढा यांनी केलेल्या तक्रारीत काही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नावाचा देखील समावेश आहे. महाजन यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले लोढा हे दर महिन्याला तक्रार करत असतात जर त्यांच्याकडे खरंच काही पुरावे असतील तर त्यांनी ते पोलिसांना द्यावे. तसेच लोढा यांच्याकडून करण्यात आलेल्या आरोपांवर रामेश्वर नाईक यांनी बोलण्यास नकार दिला.