• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

फडणवीसांचा अजितदादावर गाढा विश्वास, म्हणाले – हे दादा मला मारणार नाहीत

by Balavant Suryawanshi
March 3, 2021
in राजकीय
0
devendra-fadnavis-ajit-pawar

devendra-fadnavis-ajit-pawar

मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसरा दिवस मंगळवार (दि. 2) गाजला तो विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणाने. फडणवीस यांनी यावेळी महाविकास आघाडी सरकारच्या कारभारावर ताशेरे ओढले. तसेच त्यांनी यावेळी सांगितलेले किस्से अन् कोपरखळ्यांनी सभागृहात खसखस पिकली. फडणवीस यांनी दिलेल्या एका धमाल उदाहरणाची काल दिवसभर चर्चा रंगली होती. सत्ताधारी बाकाकडे हात करत (अजितदादाकडे) फडणवीस म्हणाले, समजा मला या दादांनी  मारले. तसे ते मला मारणार नाहीत. पण समजा मारले तर…. फडणवीस यांचे वाक्य पूर्ण होण्यापूर्वीच समोरून कोणीतरी म्हणाले. चंद्रकांतदादा मारतील. त्यावर फडणवीस म्हणाले, ते दादा तर बिलकुलच मारणार नाहीत. त्यावर अजितदादा स्मितहास्य करत होते. तर अजितदादा यांच्याविषयीचा फडणवीस यांचा गाढा विश्वास नेमका काय सांगून गेला, याचीच चर्चा नंतर दिवसभर रंगली होती.

फडणवीसांनी सांगितलेल्या गोष्टीतील नारायण भंडारी आहे तरी कोण?
राज्यात मंदिरांमध्ये लागू असलेले नियम आणि दारुच्या दुकानांना मोकळीक यावर फडणवीस यांनी हल्लाबोल केला. कोरोना मंदिरात आणि शिवजयंतीच्या कार्यक्रमामध्ये होतो बारमध्ये होत नाही का, असा सवाल करताना फडणवीस यांनी नारायण भंडारीचा भन्नाट किस्सा सांगितला. शाळेत एका वर्गात कोणाला मॉनिटर करायचे? यावर चर्चा सुरू असते. वर्गातले शिक्षक सर्व विद्यार्थ्यांना विचारतात. तुला काय वाटते सांग. एक मुलगा उभा राहून म्हणतो, मी नारायण भंडारीच्या घरून तंबाखू चुना घेऊन येईन, तुम्हाला देईन. दुसरा म्हणतो मी भंडारीच्या घरून अफू गांजा आणून तुम्हाला देतो, तिसरा म्हणतो, मी दारूचा खंबा घेऊन येतो. शेवटी शिक्षक एका कोपऱ्यात बसलेल्या मुलाला विचारतात, तू मॉनिटर झालास तर काय करशील ? तो मुलगा म्हणतो, मी सकाळी लवकर उठून आंघोळ करतो. देवाला आणि वडिलधा-यांना नमस्कार करतो. त्यानंतर जेवण करून शाळेत येतो. अभ्यासात लक्ष देतो. घरी गेल्यानंतर पुन्हा हात पाय धूवून देवाला नमस्कार करतो. जेवण करतो आणि अभ्यास करत झोपी जातो. गुरुजी एकदम खुश होतात. ते म्हणतात तुझ नाव काय बेटा? मुलगा म्हणतो मा नाव नारायण भंडारी, गुरुजी म्हणाले यालाच मॉनिटर करायचे. हे उदाहरण फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारसाठी दिले.मात्र नारायण भंडारी आहे तरी कोण आणि फडणवीस कोणाला नारायण भंडारी म्हणाले याबाबत चर्चा रंगली आहे.

आमची अँटिजेन चाचणी करा
अधिवेशनाला आलेल्या आमदार, अधिकारी आणि पत्रकार यांची येत्या शनिवारी – रविवारी पुन्हा आरटीपीसीआर तपासणी करण्यात येईल, असे सांगण्यात आले आहे. त्यामुळे त्रासलेल्या आमदारांनी आमची अँटिजेन  चाचणी करा, पुन्हा आरटीपीसीआर करण्याची काय गरज, असे म्हणत सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचे दालन गाठले. शनिवार – रविवार आम्ही मुंबईतच थांबणार आहोत. मग आमची तपासणी कशाला करता असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

Tags: Ajit PawarBhannat KissaBudgetCoronadevendra fadanvisDevendra FadnavisMahavikas Aghadi GovernmentmumbaiRTPCRShiva Jayantiअजित पावरअर्थसंकल्पआरटीपीसीआरकोरोनादेवेंद्र फडणवीसभन्नाट किस्सामहाविकास आघाडीमहाविकास आघाडी सरकारमुंबईशिवजयंती
Previous Post

Pune News : रास्ता पेठेत इमारतीला भीषण आग; मद्रासी गणपतीजवळील इमारतीला लागलेल्या आगीत 3 फ्लॅट, 2 दुकाने जळून खाक

Next Post

Farmers Protest : निवडणुकांमध्ये शेतकरी संघटना करणार भाजप विरोधात प्रचार

Next Post
farmer-protest-3

Farmers Protest : निवडणुकांमध्ये शेतकरी संघटना करणार भाजप विरोधात प्रचार

anil-ambani-reliance-communications-be-headed-insolvency
आर्थिक

अनिल अंबानींची रिलायन्स कम्युनिकेशन दिवाळखोरीच्या उंबरट्यावर, 40 हजार कोटीचे कर्ज दिलेल्या 38 बॅंकाची ‘धाकधूक’ वाढली

April 20, 2021
0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - प्रसिध्द उद्योजक अनिल अंबानी यांची एकेकाळी दूरसंचार सेवेतील आघाडीची कंपनी असलेली रिलायन्स कम्युनिकेशन दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर...

Read more
7th-pay-commission-central-govt-employees-da-will-be-increase-from-17-percent-to-28-percent

1 जुलैपासून केंद्रीय कर्मचार्‍यांचा DA होणार 28 % ! जाणून घ्या किती वाढणार सॅलरी?

April 20, 2021
another-revelation-nawab-malik-remdesivir-stock-available-former-bjp-mla-shirish-choudhari

‘रेमडेसिव्हिरचा साठा करणारा भाजपचा ‘तो’ माजी आमदार गोत्यात’

April 20, 2021
pune-take-timely-measures-for-vaccination-starting-from-may-1-pune-municipal-corporation-opposition-leaders-demand

1 मे पासून सुरु होणाऱ्या लसीकरणाची वेळेत उपाययोजना करा, पुणे मनपा विरोधी पक्षनेत्यांची मागणी

April 20, 2021
pimpri-chinchwad-coronavirus-news-updates-102

पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’चे 2563 नवीन रुग्ण, 54 जणांचा मृत्यू

April 20, 2021
coronavirus-pimpri-corona-fake-report-racket-exposed-passengers-were-paid-rs-500-report

प्रवाशांना फक्त 500 रूपयांमध्ये कोरोनाचा बनावट रिपोर्ट देणार्‍या रॅकेटचा पर्दाफाश

April 20, 2021
maharashtra-government-decide-to-cancel-ssc-class-10-exam-due-to-spike-in-covid-cases

ठाकरे सरकारचा मोठा निर्णय ! 10 वी ची परीक्षा रद्द, 12 वी च्या परीक्षाबाबत आरोग्यमंत्री टोपे म्हणाले…

April 20, 2021
veteran-actor-kishore-nandlaskar-passes-away-due-corona-virus-played-role-in-vastav-movie

ज्येष्ठ अभिनेते किशोर नांदलस्कर यांचं कोरोनामुळं निधन, ‘वास्तव’मध्ये ‘देडफुटया’च्या वडिलांची साकारली होती भूमिका

April 20, 2021
coronavirus-next-three-weeks-are-crucial-all-states-should-be-vigilant-says-central-government

मोदी सरकारचा कडक इशारा, म्हणाले – ‘पुढचे 3 आठवडे निर्णायक, सर्व राज्यांनी साधव राहावं’

April 20, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

devendra-fadnavis-ajit-pawar
राजकीय

फडणवीसांचा अजितदादावर गाढा विश्वास, म्हणाले – हे दादा मला मारणार नाहीत

March 3, 2021
0

...

Read more

कोरोनाच्या वाढत्या संकटामुळे CM ठाकरेंचा PM मोदींना फोन; केली ‘ही’ मोठी मागणी

3 days ago

Covid Outbreak in India : 20 ते 25 एप्रिलच्या दरम्यान ‘पीक’वर असेल कोरोना, एक्सपर्टने सांगितले केव्हा मिळेल दिलासा

4 days ago

Covid 19 Most Risky Places : जीवघेणी आहे कोरोनाची दुसरी लाट, वाचायचे असेल तर ‘या’ 7 ठिकाणांपासून रहा दूर

2 days ago

दुर्देवी ! तमाशाचा फड गाजवणारा तरूण ‘खलनायक’ काळाच्या पडद्याआड

5 days ago

‘मुख्यमंत्री कट्टीबट्टीचा डाव खेळत आहेत, रुग्णांच्या मृत्यूंना राज्य सरकारच जबाबदार’, प्रसाद लाड यांचा गंभीर आरोप (व्हिडीओ)

1 day ago

दुर्दैवी ! मुळा धरणाच्या कालव्यात बुडून वृद्धाचा मृत्यू

2 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat