जळगाव : बहुजननामा ऑनलाईन – लोकसभेसाठी वंचित बहुजन आघाडीतर्फे राज्यातील सर्वच जगावर उमेदवार उभे केले आहेत. जळगावमधून अंजली बाविस्कर यांनी तर रावेर मतदारसंघासाठी नितीन कांडेलकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. या वेळी दोन्ही उमेदवारांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करीत आपले उमेदवारी अर्ज जिल्हाधिकारी यांच्याकडे दाखल केले.
जळगाव लोकसभेच्या उमेदवार अंजली बाविस्कर यांनी जिल्हाधिकारी अविनाश ढाकणे यांच्याकडे अर्ज दाखल केला. तेव्हा त्यांच्यासोबत वंचित बहुजन आघाडीचे सर्वच कार्यकर्ते उपस्तित होते. त्यामध्ये प्रमोद इंगळे.किशोर निकुंभ. सुजाता ठाकूर.दिनेश ठाकूर.सूर्यकांत भालेराव उपस्थित होते. तर रावेर मतदारसंघाचे उमेदवार नितीन कांडेलकर यांनी अर्ज भरला असता कारकर्त्यासह उपस्थित होते. जळगावमधून भाजप शिवसेनेच्या युतीचा उमेदवार आणि काँग्रेस उमदेवारच्या तुलनेत वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार किती प्रमाणात टक्कर देणार हे निवडणुकीच्या नंतरच याचे चित्र पाहायला मिळेल.